कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:15 AM2020-07-28T11:15:40+5:302020-07-28T11:23:52+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, डॉक्टर पीपीई किट न घालता रुग्णावर उपचार करत आहेत, तेही जुगाडकरून.

doctor using long stethoscope to prevent coronavirus twitter users loved it see viral video | कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार

कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार

Next
ठळक मुद्देहा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला हसू येईल. मात्र, सध्याची परिस्थिती गंभीर आहे.लोकांनी ट्विटरवर या डॉक्टरला 'डॉक्टर ऑफ द इयर' म्हणून घोषित केले.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. एकीकडे, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जणांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. तर, दुसरीकडे रुग्णालयात ठामपणे उभे राहून डॉक्टर कोरोनाचा सामना करीत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, डॉक्टर पीपीई किट न घालता रुग्णावर उपचार करत आहेत, तेही जुगाडकरून. या डॉक्टरांनी स्टेथोस्कोप वायर लांब केली आहे आणि रुग्णाला लांब बसवले असून त्यालाच स्टेथोस्कोप धरण्यास सांगितले आहे. 

हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला हसू येईल. मात्र, सध्याची परिस्थिती गंभीर आहे. रुग्णालयामध्ये फ्रंटलाइन डॉक्टर्स रूग्णांजवळ राहूनच त्यांच्यावर उपचार करत आहेत. तर क्लिनिकमध्ये हे डॉक्टर पीपीई किटशिवाय असे उपचार करत आहेत.

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, डॉक्टर क्लिनिकमध्ये बरेच लांब बसले आहेत आणि रुग्णाला बेडच्या दुसर्‍या बाजूला ठेवलेले आहेत. ते रुग्णाला स्टेथोस्कोप छातीवर ठेवण्यास सांगतात आणि त्याच्या हृदयाचे ठोके लांबूनच ऐकतात. त्यानंतर रुग्ण लांबूनच आपली समस्या सांगत आहे. 

दरम्यान, लोकांनी ट्विटरवर या डॉक्टरला 'डॉक्टर ऑफ द इयर' म्हणून घोषित केले. हा व्हिडिओ २७ जुलैला शेअर करण्यात आला असून आतापर्यंत ६०० हून अधिक जणांनी पाहिला आहे. तसेच, लोकांनी या व्हिडीओला अनेक कमेंट्स दिल्या आहेत.

आणखी बातम्या...

अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा     

राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित

Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार!    

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी    

पब्जीसह २७५ चिनी अ‍ॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत    

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!    

Web Title: doctor using long stethoscope to prevent coronavirus twitter users loved it see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.