कोविड ICU मध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर डॉक्टर्स थिरकले; नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:08 PM2021-02-10T16:08:35+5:302021-02-10T16:10:45+5:30
Viral Video : ICU मधील डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल
सध्यो सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होत आहे. यामध्ये काही डॉक्टर्स पीपीई किट घालून सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राजस्थानमधील अलवर येथील राजीव गांधी गव्हर्नमेंट जनरल हॉस्पीटलचा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या रूग्णालयातअसलेल्या आयसीयूमध्ये काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामादरम्यान पीपीई किट परिधान करून डान्स केला आणि व्हिडीओ तयार करू सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगण्यात आलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांकडून त्या डॉक्टरांचं समर्थन करण्यात आलं आहे. तर काही जण या व्हिडीओवर प्रश्नचिन्हही उपस्थित करत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर केली. काही जणांनी या कर्मचाऱ्यांनी आयसीयूमध्ये आपल्या कामादरम्यान नृत्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु त्या नंतर या डॉक्टरांनी याबद्दल माफी मागितली.
#WATCHराजस्थान: अलवर के राजीव गांधी जनरल अस्पताल के नर्सिंग कर्मी एक वायरल वीडियो में कोविड ICU में ड्यूटी के दौरान डांस करते नज़र आए। (8.02.21) pic.twitter.com/hFt9LKnTBO
— ANI_HindiNews (@AHindinews) February 10, 2021
अशी घटना पहिल्यांदा घडली नाही. यापूर्वीही अशा नृत्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओला अनेकांकडून पसंतीही मिळत असून अनेकांनी लाईकही केल्या आहेत. तर काहींनी हा निष्काळजीपणा आहे का असा सवाल केला आहे.