महिलेच्या कानातून येत होता विचित्र आवाज, जे दिसलं ते पाहून डॉक्टर झाले थक्क...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 02:13 PM2019-08-27T14:13:55+5:302019-08-27T14:15:31+5:30

आधी महिलेला वाटलं स्वीमिंग करताना कानात पाणी गेलं असेल. पण नंतर वेदना वाढल्या आणि वेळीच डॉक्टरांकडे गेली

Doctor's find venomous brown recluse spider in woman's ear in America | महिलेच्या कानातून येत होता विचित्र आवाज, जे दिसलं ते पाहून डॉक्टर झाले थक्क...

महिलेच्या कानातून येत होता विचित्र आवाज, जे दिसलं ते पाहून डॉक्टर झाले थक्क...

googlenewsNext

(Image Credit : www.nashunchealthcare.org)

अमेरिकेतील एक महिला नेहमीप्रमाणे घरातील कामे करत होती, अशाचत अचानक तिला कानातून जोरात आवाज येऊ लागला. महिलेला वाटले की, स्वीमिंग करताना कानात पाणी गेलं असावं. पण काही वेळाने कानात फार जास्त वेदना होऊ लागली होती. जेव्हा ती डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा कानातील चित्र पाहून डॉक्टरही हैराण झाले. कारण या महिलेच्या कानात एक विषारी कोळी गेला होता.

ही महिला अमेरिकेलीत Kansas शहरातील राहणारी असून तिचं नाव Susie Torres असं आहे. कानात आवाज येऊ लागल्यावर तिने कान साफ केला. पण त्याने काही फायदा झाल नाही. ती लगेच डॉक्टरांकडे गेली आणि कानात आवाज येण्याचं आणि वेदना होण्याचं कारण समोर आलं.

(Image Credit : www.wptv.com)

डॉक्टरांनाही लगेच काय करावं हे कळत नव्हतं. नंतर दोन नर्स, एक डॉक्टर आणि तीन मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी महिलेच्या कानात पाहिलं तर त्यांना कानात पाणी नाही तर एक विषारी कोळी आढळून आला. ही भुरक्या रंगाचा कोळी इतका विषारी असते की, व्यक्तीला चावला तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

डॉक्टरांनी आधी महिलेला सांगितले की, कोळी कानात मरण पावला होता. घाबरण्याचं काही कारण नाही. त्यानंतर कोळीचे पाय आणि मागचा भाग कानातून काढण्यात आला. पण जेव्हा कोळी पूर्णपणे कानाबाहेर काढण्यात आला तेव्हा तो जिवंत असल्याचं दिसून आलं. सुदैवाने कोळीने महिलेला चावा घेतला नव्हता. आता या घटनेने महिला इतकी घाबरली आहे की, ती रात्री कानात इअर प्लग घालून झोपते.

Centers for Disease Control And Prevention नुसार, हा कोळी चावल्याने मांसपेशींमध्ये वेदना, मळमळ, श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच इतरही काही लक्षणे दिसतात. सामान्यपणे हे कोळी आक्रामक नसतात. पण यांची कुणी छेड काढली तर त्यांचा चावा घेतल्याशिवाय सोडत नाही.  

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर तुम्हाला वाटत असेल की, कानात काही गेलं आहे. तर अशावेळी कानात खोबऱ्याचं तेल किंवा पाणी टाकून तुम्ही ते कानात गेलेलं काहीही बाहेर काढू शकता. जर याने आराम मिळाला नाही तर वेळ न घालवता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Web Title: Doctor's find venomous brown recluse spider in woman's ear in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.