खरंच वळू लाल रंग किंवा लाल रंगाचे कपडे बघून भडकतात का? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 01:03 PM2024-11-13T13:03:35+5:302024-11-13T13:23:47+5:30

एक महत्वाचा प्रश्न आहे की, खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून भडकतात का? 

Does the colour red really anger bulls? fact check | खरंच वळू लाल रंग किंवा लाल रंगाचे कपडे बघून भडकतात का? जाणून घ्या सत्य...

खरंच वळू लाल रंग किंवा लाल रंगाचे कपडे बघून भडकतात का? जाणून घ्या सत्य...

अनेक सिनेमे किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघितलं असेल की, वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तीच्या मागे धावतात किंवा त्यांच्यावर हल्ला करतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बघायला मिळतं की, लाल शर्ट घातलेल्या एका व्यक्तीवर वळू हल्ला करतो. मात्र, एक महत्वाचा प्रश्न आहे की, खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून भडकतात का? 

एक्सवर @gharkekalesh नावाच्या हॅंडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात दिसत आहे की, रस्त्यावरील एका लाल कपडे घातलेल्या व्यक्तीच्या मागे वळू धावत आला आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. वळूमुळे अनेक नव्या बाइकचं नुकसानही झालं. वळूच्या या हल्ल्यात लाल कपडे घातलेली व्यक्ती कशीतरी आपला जीव वाचवून पळून जाते.

या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिलं की, आणखी घाला लाल कपडे. दुसऱ्याने लिहिलं की, वळूला लाल रंग आवडत नाही. बरेच लोक लाल कपडे घालतात, जे कधीकधी घातक ठरू शकतं. अशाप्रकारच्या कमेंट्स यावर येत आहेत. बरेच लोक वळू भडकण्याला लाल रंगच जबाबदार धरत आहे. 

खरंच वळू लाल रंग बघून भडकतात का?

या व्हिडिओनंतर अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, खरंच वळू लाल रंग बघून भडकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. कारण वळूच्या खेळात मेटाडोर आपल्या हातात लाल कपडा घेऊन त्याला खुणावतो आणि आपल्याकडे येण्यास सांगतो. काही सिनेमातही असंच दाखवण्यात आलं आहे. याच कारणाने असं मानलं जातं की, लाल रंग बघून वळू भडकतो. मात्र, यात काहीच तथ्य नाही.

मुळात वळू पार्शिअली कलर ब्लाईंड असतात. त्यांना रंगांची समज नसते. त्यांच्या लाल रिसेप्टरची कमतरता असते आणि ते केवळ पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा रंगच बघू शकतात. रेडिनावरील सूक्ष्म कोशिकांमुळेच रंगाची ओळख पटवता येते. अशीच एक सूक्ष्म कोशिका ज्यामुळे लाल रंग ओळखता येतो, ती बैलांमध्ये नसते.
हे तर वैज्ञानिक दृष्ट्या स्पष्ट आहे की, वळू लाल रंग बघून भडकत नाही आणि त्यांना लाल रंगही दिसत नाही. वळूच्या खेलात बुलफायटर जेव्हा हातात लाल कपडा घेऊन हलवतो, ती हालचाल पाहून वळू भडकतात. 

त्यामुळे वळू लाल रंग बघून किंवा लाल कपडे बघून भडकतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते व्यक्तीची हालचाल किंवा व्यवहार पाहून किंवा इन्सिक्युरिटीच्या कारणाने हल्ला करतात. लोकांना वाटतं की, लाल रंगामुळे भडकला असेल, तर हा फक्त एक गैरसमज आहे.
 

Web Title: Does the colour red really anger bulls? fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.