महिलेची शेवटची इच्छा वाचून व्हाल हैराण, म्हणाल..अशी तर कधी कल्पनाही केली नसती!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:35 PM2019-05-29T16:35:21+5:302019-05-29T16:39:24+5:30
तुम्ही अनेकदा सिनेमात पाहिलं असेल की, फाशी देण्याआधी दोषी व्यक्तीला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते आणि त्याची ती शेवटची इच्छा पूर्ण केली जाते.
(Image Credit : AmarUjala)
तुम्ही अनेकदा सिनेमात पाहिलं असेल की, फाशी देण्याआधी दोषी व्यक्तीला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते आणि त्याची ती शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. असंच पूर्वी लोकांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आवडीचं सामान त्यांच्यासोबत दफन केलं जात होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे सगळं आता आम्ही का सांगत बसलोय?
असंच एक प्रकरण समोर आलं असून ते जाणून घेतल्यावर तुम्ही अवाक् होऊ शकता आणि दु:खीही होऊ शकता. अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये एक अशी घटना घडली, जिथे तुम्हाला मृत्यू, जीवन, हट्ट आणि इच्छा यांचं कॉकटेल बघायला मिळेल. इथे एका महिलेने तिची अशी शेवटची इच्छा व्यक्ती केली की, तिला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य संपवावं लागलं.
व्हर्जिनियामध्ये एका महिलेजवळ एक कुत्रा होता. आणि दोघे सोबत चांगले राहत होते. पण जेव्हा महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तिने तिची शेवटची सांगितली की, तिच्यासोबत तिच्या कुत्र्याला सुद्धा दफन करण्यात यावं. पण कुत्रा एकदम टणटणीत आणि सुदृढ होता.
झालं पशु प्रेमी संस्थांनी कुत्र्याच्या अधिकारांवर लढाई सुरू केली. त्यांचं म्हणणं होतं की, जर कुत्रा अजूनही जगतो आहे, तर त्या महिलेसोबत दफन करण्यासाठी त्याला का मारायचं? पण व्हर्जिनियाचा कायदा वेगळाच आहे. यूरोपच्या अनेक देशांमध्ये कुत्र्यांना खाजगी संपत्ती मानलं जातं. त्यामुळे मालक त्यांना हवं ते कुत्र्यासोबत करू शकतात. आणि याच कारणामुळे कायद्यानुसार, मालिकाला हा अधिकार आहे की, त्याच्या मृत्यूनंतर कुत्र्यालाही दफन करता येतं.
Healthy dog euthanized to be buried with owner in Virginia https://t.co/nocPAHbv68#KMOVpic.twitter.com/ehB3ZOlAKM
— KMOV (@KMOV) May 22, 2019
असा कायदा असला तरी याचा अर्थ हा नाही की, मालक कुत्र्यांना कधीही मारू शकतील. यासाठी पूर्ण प्रक्रिया आहे. मालकाला जनावरांच्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घ्यावं लागतं. ज्यात कुत्र्याला मारण्यासाठीची अनेक कारणे असू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्या कुत्र्याचं काय झालं. तर त्या कुत्र्याला आधी मारण्यात आलं आणि त्याच्या मालकीनीसोबत दफन करण्यात आलं.