ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला खायला दिले 1 कोटी; जेव्हा समजलं तेव्हा ढसाढसा रडली मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:18 PM2023-04-03T15:18:02+5:302023-04-03T15:26:39+5:30
एका महिलेने आपल्या कुत्र्याला एक, दोन हजार नाही तर तब्बल 1 कोटी रुपये खायला दिल्याची घटना समोर आली आहे.
आपल्यापैकी अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. घरात राहून हे प्राणी कुटुंबातील सदस्यासारखे बनतात. विशेषत: जर आपण कुत्र्यांबद्दल बोललो तर ते त्यांचे मालकाच्या कुटुंबाशी चांगलं जुळतं. यामुळेच मालकही त्यांच्यावर खूप प्रेम करतात. असंच प्रेम एका महिलेला महागात पडलं आहे. एका महिलेने आपल्या कुत्र्याला एक, दोन हजार नाही तर तब्बल 1 कोटी रुपये खायला दिल्याची घटना समोर आली आहे.
ड्रॅव्हलो नावाच्या युजरने ही गोष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर केली आहे. तिने सांगितले की तिच्याकडे एक काळ्या रंगाचा लेब्राडोर आहे, जो फक्त गोंडसच नाही तर खूप शिस्तप्रिय देखील आहे. 3 आठवड्यांपूर्वी तिने तिच्या कुत्र्याचा चिप्स खाताना व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये मालकिणीच्या हातात हृदयाच्या आकाराचा चिप्स होता, जो कुत्रा खाण्याची वाट पाहत होता.
महिलेने आदेश देताच कुत्र्याने पटकन चिप्स खाल्ला. मात्र या चिप्सची किंमत तब्बल एक कोटी रुपये होते. महिला खूप खूश होती पण तिला जेव्हा सत्य समजलं तेव्हा ती ढसाढसा रडायला लागली. पोस्टमध्ये, ड्रॅव्हलो म्हणाली की, वॉकर्स क्रिस्पकडून हार्ट शेप क्रिस्प हंटिग स्पर्धा सुरू होती. यामध्ये वॉकर्स क्रिस्प खाणाऱ्यांना परफेक्ट ह्रदयाच्या आकाराचे क्रिस्प शोधायचे होते.
एका पॅनेल हे सर्व जज करत होतं आणि परफेक्ट हृदयाच्या आकाराच्या क्रिस्पला £100,000 म्हणजेच 1 कोटी रुपयांहून अधिक बक्षीस मिळेल. युजरचा चिप्स अगदी हृदयाच्या आकाराच्या असल्याने, स्पर्धेबद्दल जाणून घेतल्याने तिला खूप दुःख झाले आणि पश्चात्ताप झाला. त्याचवेळी लोक तिचे सांत्वन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"