कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 18:34 IST2021-09-10T18:34:20+5:302021-09-10T18:34:58+5:30
Viral Video: कुत्र्याच्या पॅराग्लायडिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुत्र्यानं मालकासोबत केली पॅराग्लायडिंग, पाहा हा गोंडस व्हिडिओ
दररोज सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्हाला अशाप्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, तर हा व्हिडिओही तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडिओमध्ये चक्क एका कुत्र्यानं पॅराशूट बांधून पॅराग्लायडिंग केल्याचं दिसत आाहे. पण, या कुत्र्याने एकट्याने नाही तर आपल्या मालकासोबत ही पॅराग्लायडिंग केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल क्लिपमध्ये कुत्रा आणि मालक पॅराग्लायडिंग करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये कुत्रा काहीच न घाबरता अतिशय गोंडसपणे या पॅराग्लायडिंगचा अनुभव घेताना दिसतोय. Ouaka.sam नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
कुत्र्याच्या मालकानं कुत्र्यासोबतच्या अद्भुत अनुभवाचे काही फोटो आणि इतर व्हिडिओही शेअर केले आहेत. या गोंडस कुत्र्याचा व्हिडिओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर नेटीझन विविध कमेंट्स करत आहेत.