...तर नदीमध्ये बुडाली असती 'ही' चिमुकली, श्वानानं चलाकीनं वाचवला जीव; पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 08:49 PM2021-02-22T20:49:03+5:302021-02-22T20:53:29+5:30
असे म्हटले जाते, की माणसाचे आणि श्वानाचे नाते फार जुने आहे. हा प्राणी आपली मैत्री केवळ प्राण्यांसोबतच नाही, तर माणसासोबतही तेवढीच घट्ट करतो. तो आपली जबाबदारीही चांगल्या प्रकारे ओळखतो. (Viral video)
मुंबई - सोशल मिडियाच्या जगतात सातत्याने प्राण्यांसंदर्भातील व्हिडिओज व्हायरल होत असतात. अशा व्हिडिओजना युझर्सचीही जबरदस्त पसंती मिळते. हे व्हिडिओ एवढे गमतीशीर असतात की याची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा रंगते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला, की आपल्यालाही कळेल, श्वानाला (कुत्रा) (Dog) माणसाचा सर्वाधिक प्रामाणिक मित्र का म्हटले जाते.
व्हिडिओची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा -
असे म्हटले जाते, की माणसाचे आणि श्वानाचे नाते फार जुने आहे. हा प्राणी आपली मैत्री केवळ प्राण्यांसोबतच नाही, तर माणसासोबतही तेवढीच घट्ट करतो. एवढेच नाही, तर तो आपली जबाबदारीही चांगल्या प्रकारे ओळखतो. याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. नव्हे हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल देखील होत आहे.
रस्त्यावरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली 139 वर्ष जुनी दोन मजली इमारत, व्हिडिओ व्हायरल
एक छोटी मुलगी आणि एका पाळीव श्वानाचा व्हिडिओ सध्या लोकांत चर्चेचा विषय आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक मुलगी चेंडू आणण्यासाठी नदीत जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, तेथेच जवळ बसलेला श्वान तिला वारंवार मागे ओढतो. एवढेच नाही, तर मुलगी नाराज होऊ नये, म्हणून तो स्वतःच नदीपात्रात उतरून तिचा बॉल आणतो.
The best time to make friends is before you need them💕 pic.twitter.com/zlZlkM9IkY
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 22, 2021
बातमी लिहण्यापर्यंत तब्बल 33.8 हजार युझर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला जवळपास 5 हजार लाइक्स आले आहेत. तर 924 जणांनी हा व्हिडिओ रीट्विट केला आहे. अनेक जण या व्हिडिओवर प्रतिक्रियाही देत आहेत.
हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
जणावरांना प्रेमाची भाषा समजते -
हा व्हिडिओ नेमका कुठला? यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या कुत्र्याची समजदारी आणि प्रामाणिकपणाची यूझर्स तारीफ करत आहेत. अनेक युझर्सनी लिहिले आहे, की या कुत्र्याने समजदारी आणि सतर्कता दाखवली नसती, तर वाईट घटना घडण्याची शक्यता होती. तसेच अनेकांनी लिहिले आहे, की जणावरांना प्रेमाची भाषा फार चांगल्या प्रकारे समजते.