बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात? 'ही' ट्रीक करून पाहा, ना मागे येणार आणि भुंकणंही होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:25 AM2022-08-10T11:25:44+5:302022-08-10T11:26:21+5:30

Dogs Chasing Bike In Night: अनेकदा बाईक, स्कूटर चालवताना तुम्हाला असा अनुभव आला असेल.

dog would not bark or run behind on you while riding bike in night follow this tip | बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात? 'ही' ट्रीक करून पाहा, ना मागे येणार आणि भुंकणंही होईल बंद

बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात? 'ही' ट्रीक करून पाहा, ना मागे येणार आणि भुंकणंही होईल बंद

googlenewsNext

Dogs Chasing Bike In Night: देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग दुचाकीनं प्रवास करतो, मग ती मोटरसायकल असो किंवा स्कूटर. दुचाकीनं प्रवास करण्याचे स्वतःचे फायदे आणि तोटे असू शकतात. परंतु असं असूनही, ते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तुम्ही सुद्धा मोटरसायकल किंवा स्कूटर वापरत असाल आणि जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही देखील कधीतरी असा अनुभव घेतला असेल की रात्रीच्या वेळी बाईकवरून प्रवास करताना काही वेळा कुत्रे बाईकचा पाठलाग करतात आणि चावायला धावतात. हे जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत घडलं असेल. कुत्रे मागे लागले तर एकतर तुम्ही गाडीचा वेग वाढवता नाही, तर धडपडून अपघातही होण्याची शक्यता असते.

अशा स्थितीत कुत्रे का भुंकतात आणि ते टाळण्याचा उपाय काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात असू शकतो. कुत्रे भुंकण्याची अनेक कारणे असू शकतात. पण हा प्रकार टाळण्याचा मार्ग काय आहे हे आपण पाहूया. खरं तर, जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी बाईक किंवा स्कूटरवरून कुत्र्यांच्या बाजूनं जात असता तेव्हा तुमच्या वेगामुळे ते भुंकतात आणि तुमचा पाठलाग करतात. पण, असे होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

बाईकवरून जात असताना कुत्रे मागे लागल्यावर घाबरू नका. त्यांच्यापासून सुटका करण्याचा उपाय अतिशय सोपा आहे. घाबरून जाऊन बाईक वेगात पळवू नका. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका असतो. त्याऐवजी बाईकचा वेग कमी करा. असं केल्यानंतर बहुतांश कुत्रे पळणं आणि भुंकणं बंद करतात.

तुम्ही वेग कमी केल्यानंतरही त्यांचं भुंकणं किंवा पाठलाग करणं थांबत नसेल तर तुम्ही गाडी थांबवा. त्यानंतर कुत्रे काही मिनिटांतच त्यांच्या मार्गानं निधून जातील. त्यानंतर तुम्ही आपल्या गाडीचा वेग हळूहळू वाढवा आणि त्या ठिकाणाहून निघून जा. कुत्रे भुंकत मागे लागले असताना दुचाकीचा वेग कमी करणं किंवा दुचाकी थांबवणं हेच उत्तम उपाय आहेत.

Web Title: dog would not bark or run behind on you while riding bike in night follow this tip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.