'इथे' कुत्रे आणि मांजरीही करतात रक्तदान, जागोजागी आहेत ब्लड बॅंक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 02:13 PM2019-10-15T14:13:38+5:302019-10-15T14:22:51+5:30
तुम्हीही अनेकदा रक्तदान केलं असेल किंवा रक्तदान शिबिरात वेगवेगळ्या लोकांना रक्तदान करतानाही पाहिल असेलच. हे रक्त वेगवेगळ्या ब्लड बॅंकमध्ये साठवलं जातं.
(Image Credit : bluepearlvet.com)
तुम्ही अनेकदा रक्तदान केलं असेल किंवा रक्तदान शिबिरात वेगवेगळ्या लोकांना रक्तदान करतानाही पाहिल असेलच. हे रक्त वेगवेगळ्या ब्लड बॅंकमध्ये साठवलं जातं. पण कधी तुम्ही जनावरांच्या ब्लड बॅंकबाबत ऐकलंय का? फार कमी लोकांना माहीत असेल की, मनुष्यांप्रमाणे प्राण्यांचीही ब्लड बॅंक आहेत.
जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये 'पेट्स ब्लड बॅंक' तयार करण्यात आल्या आहेत. या ब्लड बॅंकांमध्ये कुत्रे आणि मांजरांचं रक्त ठेवलं जातं. कारण हे असे प्राणी आहेत, जे सर्वात जास्त पाळले जातात. त्यामुळे जर एखादा कुत्रा किंवा मांजर जखमी झाला असेल किंवा त्यांना रक्ताची गरज असेल तर ही ब्लड बॅंक त्यांच्या कामात येते.
(Image Credit : vancouversun.com)
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कुत्रे आणि मांजरांमध्येही मनुष्यांप्रमाणे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स असतात. कुत्र्यांमध्ये एकूण १२ प्रकारचे ब्लड ग्रुप असतात तर मांजरींमध्ये तीन प्रकारचे ब्लड ग्रुप असतात.
(Image Credit : kidsnews.com.au)
उत्तर अमेरिकेतील एका अशाच ब्लड बॅंकेचे व्यवस्थापक डॉक्टर केसी मिल्स यांच्यानुसार, कॅलिफोर्नियाच्या डिक्सन आणि गार्डन ग्रोव शहरासोबतच मिशिगनमधील स्टॉकब्रिज, व्हर्जिनिया, ब्रिस्टो आणि मेरीलॅंडच्या एका शहरात ब्लड बॅंक आहे. इथे वेळोवेळी पाळीव प्राण्यांचे लोक त्यांचे प्राणी घेऊन येतात आणि त्यांच्या प्राण्यांकडून रक्तदान करवतात.
डॉ. मिल्स सांगतात की, प्राण्यांच्या रक्तदान प्रक्रियेत जवळपास अर्ध्या तासाचा वेळ लागतो आणि सर्वात खास बाब ही आहे की, त्यांना अॅनेस्थेशिया देण्याचीही गरज पडत नाही.
(Image Credit : phz8.petinsurance.com)
ज्या ठिकाणांवर असे ब्लड बॅंक नाहीत, तिथे लोकांना जागरूक करण्यासाठी काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एका रिपोर्ट्सनुसार, ब्रिटन आणि अमेरिकेत लोक पशु रक्तदानाबाबत चांगलेच जागरूक आहेत. इतरही ठिकाणी ही जागरूकता वाढवण्याची गरज आहे.