रात्रीच्या वेळी तुमच्या बाईकवर कुत्रे भुंकतात? एवढी एकच ट्रिक करून पाहा; ना मागे लागतील, ना भुंकतील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:35 PM2023-03-03T13:35:22+5:302023-03-03T13:35:22+5:30
जे लोक रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करतात, त्यांना कधी ना कधी, गाडीवर कुत्रे भुंकल्याचा आणि मागे लागण्याचा अनुभव नक्कीच आला असेल.
दुचाकींच्या बाबतीत भारत ही जगातील सर्वात मोठ्या बाजपेठेपैकी एक आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक दुचाकीने प्रवास करतात. जसजशी लोकांची धावपळ वाढत आहे, जीवन गतिमान होत आहे, तस-तसे दिवस आणि रात्र यांतील अंतरही कमी होत चालले आहे. आता मोठ्या प्रमाणावर लोक रात्रीच्या वेळीही प्रवास करताना दिसतात. अशात जे लोक रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करतात, त्यांना कधी ना कधी, गाडीवर कुत्रे भुंकल्याचा आणि मागे लागण्याचा अनुभव नक्कीच आला असेल. असे अनेवेळा होते.
रात्रीच्या वेळी बाईकवर का भुंकतात कुत्रे? -
मात्र असे होऊ नये असे आपल्याला नक्कीच वाटत असेल. एवढेच नाही, तर कुत्रे गाडीवर का भूंकतात? ते गाडीमागे का लागतात? हा टाळण्याचा उपाय काय, असे प्रश्न अनेकांच्या मनात आलेले असू शकतात. खरे, तर कुत्रे भुंकण्याची अनेक कारणं असू शकतात. खरे तर, आपण जेव्हा रात्रीच्या वेळी बाईक अथवा स्कूटरवरून कुत्र्यांच्या बाजूने जातो, तेव्हा आपल्या वेगामुळे ते भडकतात आणि भुंकत पाठलाग करतात. मात्र, असे होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
वापरा ही ट्रिक -
रात्रीच्या वेळी आपल्या बाईकवर कुत्र्यांनी भुंकूनये आणि बाईक मागे लागू नये, असे आपल्याला वाटत असेल तर, त्यांच्याजवळून जाताना बाईकचा वेग कमी करा. आपल्या लक्षात येईल, की असे केल्याने कुत्रे आपल्यावर भुंकत नाहीत. तथापी, तुमची बाईक कमी वेगात असतानाही कुत्रे तुमच्यावर चालून आले तरी घाबरून गाडी वेगात चालवू नका कारण यामुळे अपघातही होऊ शकतो.
अशा स्थितीत, बाईक थांबवा. कुत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करा. यानंतर हळू हळू बाईक पुढे न्या आणि तेथून निघून जा. सर्वसाधारणपणे असे केल्याने कुत्रे मागे फिरतात.