फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:58 PM2020-12-08T18:58:35+5:302020-12-08T19:04:17+5:30

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांच्या अंदाजानुसार ट्रम्प सुट्टीतील वेळ घालवण्यासाठी निघतील आणि पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये कधीही येणार नाहीत. 

Donald trump holidays final weeks speculation white house | फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

Next

अमेरिकते निवडणूकीनंतर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प शेवटच्या काही दिवसांसाठी वॉशिंग्टनला येऊ शकतात. सध्या डोनाल्ड ट्रम्प सुट्ट्याचा वेळ घालवण्यासाठी फ्लोरिडामध्ये  राहतील अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत.  आतापर्यंत काही ठरलेले नाही. असा खुलासाही त्यांनी केला होता. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांच्या अंदाजानुसार ट्रम्प सुट्टीतील वेळ घालवण्यासाठी निघतील आणि पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये कधीही येणार नाहीत. 

सध्या  क्रिसमस आणि नवीन वर्षासाठी फ्लोरिडाला जाऊन  राहण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. ट्रम्प यांच्या ख्रिसमस सहलीची माहिती  ठेवत असलेल्या काही लोकांचे म्हणणे आहे की राष्ट्राध्यक्षांच्या कर्मचार्‍यांना मिळालेल्या सुचनेनुसार दौरा पाम बीच येथे थांबण्यापर्यंत आहेत. यावरून असे सूचित होते की सुट्टीनंतर ट्रम्प कधीही व्हाईट हाऊसमध्ये परत येऊ शकत नाहीत.

Donald Trump

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ट्रम्प हे शेवटचे काही दिवस वॉशिंग्टनमध्ये येऊ शकतात, परंतु सुट्टीनंतर ट्रम्प फ्लोरिडामध्येच राहणार असल्याचीही चर्चा आहे. एकीकडे ट्रम्प यांनी वारंवार अध्यक्षीय निवडणुकीत धांदल उडवल्याचा आरोप  लोकांनी केला आहे. दुसरीकडे ट्रम्प पुन्हा निवडणूक लढवू शकतात अशाही चर्चा रंगल्या आहेत. 

याआधी हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं होतं. त्यामुळे याच विधानाने ट्रम्प यांनी आता थेट 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे बोललं जात आहे. "ही चार वर्षे खूपच छान होती" असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हटलं होतं. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते. 

एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प हे 20 जानेवारी 2024 रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांची चलती असेल असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.

Web Title: Donald trump holidays final weeks speculation white house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.