आता गाढवही देणार नायब तहसीलदार पदाची परीक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 11:02 PM2018-04-27T23:02:23+5:302018-04-27T23:02:23+5:30
सरकारी बाबूंचा असाही गाढवपणा
श्रीनगर: समजा तुम्ही एखाद्या शासकीय परीक्षेला बसणार असाल, त्यासाठी तुम्ही अर्ज केला. परीक्षेचं प्रवेशपत्रही तुम्हाला आलं आणि त्यावर तुमच्याऐवजी जर गाढवाचा फोटो असेल, तर तुम्हाला नेमकं काय वाटेल? हे प्रवेशपत्र तयार करणारे गाढव आहेत का? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मात्र असं खरंच घडलंय. जम्मू काश्मीर सरकार लवकरच नायब तहसीलदार पदासाठी प्रवेश परीक्षा घेणाराय. यासाठी छापण्यात आलेल्या एका प्रवेशपत्रावर चक्क गाढवाचं चित्र छापण्यात आलंय. सध्या हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय.
Ridiculous 😂
— Akash Sharma (@AkashPrime1) April 26, 2018
J&KSSB has issued Admit Card to a "Donkey" for the Exam of Naib Tehsildar pic.twitter.com/6nBp6FoVmT
दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी गायीचा फोटो असलेलं प्रवेशपत्र छापलं होतं. या 'गाढव'पणात आता सरकारी कर्मचाऱ्यांनी भर घातलीय. जम्मू आणि काश्मीर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डानं 'काचूर खार' नावानं प्रवेशपत्र तयार केलंय. यावर एका गाढवाचा फोटो आहे. रविवारी रविवारी जम्मू काश्मीरमध्ये नायब तहसीलदार पदासाठी परीक्षा होतेय. आता या परीक्षेला हे गाढव येणार की या गाढवपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणाराय. ट्विटर सध्या या प्रवेशपत्राची जोरदार चर्चा आहे.