हा डोसा पाहुन लोकं म्हणत आहेत या डोसावाल्याला अटक करा! ट्वीटरवर #dosa ट्रेण्डमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:22 PM2021-09-07T19:22:08+5:302021-09-07T19:24:24+5:30
सध्या #Dosa ट्विटरवर ट्रेण्ड करत आहे. यामागे कारण आहे डोश्याची नवी रेसिपी. या रेसिपिचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला. पण हा व्हिडिओ डोसा आवडला म्हणून ट्रेण्डमध्ये नाही तर हा डोसा ट्वीटरकरांना अजिबात पचनी पडलेला नाही. ही रेसिपी पाहुन लोकं म्हणतायत की ते डोसा खाणं सोडून देतील.
दक्षिण भारतीय डिश डोसा म्हणजे अनेकांचे आवडते स्ट्रीट फुड. या रेसिपीवर बरेच प्रयोग केले जातात. तुम्हीही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील. सध्या #Dosa ट्विटरवर ट्रेण्ड करत आहे. यामागे कारण आहे डोश्याची नवी रेसिपी. या रेसिपिचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला. पण हा व्हिडिओ डोसा आवडला म्हणून ट्रेण्डमध्ये नाही तर हा डोसा ट्वीटरकरांना अजिबात पचनी पडलेला नाही. ही रेसिपी पाहुन लोकं म्हणतायत की ते डोसा खाणं सोडून देतील.
डोसा बनवणाऱ्या एका दुकानदाराचा व्हिडिओ ट्विटरवर @ragiing_bull नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. हे आतापर्यंत २ मिलियनहुन अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दुकानदारावर अक्षरश: चिडले आहेत. कोणी म्हणत आहे की चांगलया डोश्याची वाट लागलीये. तर काहींनी प्रश्न केला की हा डोसा बनवत आहे की पिझ्झा ? एकानं तर चक्क दुकानदाराच्या अटकेची मागणी केली आहे.
How to screw a Dosa.
— Deepak Prabhu (@ragiing_bull) September 5, 2021
The purists will cringe seeing this. pic.twitter.com/y6cptCv943
या व्हायरल व्हिडीओनंतर डोसा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड करायला लागला आहे. लोक हॅशटॅग लावून डोसाचे फोटो शेअर करत आहेत. एकानं लिहिलंय की आधी हा डोसा होता, मग तो हलवा झाला आणि शेवटी तो पान बनला.
Please arrest this man for homicide. RIP Dosa! 🤢 https://t.co/7mvECKjihL
— Kshitij Sharma. (@_ghostcookies) September 6, 2021
Wat it is 🤔Pizza or anything but not #Dosa 🙃 https://t.co/vBfbxhKDr2
— ©️h🅰️ndu♡Vℹnn🅰️s-🌝 (@chanduuvinna) September 6, 2021