हुंडा - एक कडवट वास्तव
By admin | Published: February 25, 2016 07:45 PM2016-02-25T19:45:56+5:302016-02-25T19:45:56+5:30
‘आॅक्सिजन’च्या हाती लागलेलं एक कडवट वास्तव. शुक्रवारच्या ‘आॅक्सिजन’ पुरवणीत!
‘आॅक्सिजन’च्या हाती लागलेलं एक कडवट वास्तव.
शुक्रवारच्या ‘आॅक्सिजन’ पुरवणीत!
धक्का बसेल अशा उत्तरांमधून
डोकं भिरभिरवून टाकणाऱ्या नव्या प्रश्नांचा
एक विशेषांक
हुंडा - शिकल्या-सवरल्या तरुण मुलग्यांना हवा आहेच, पण खिशात पैसे आणि डोक्यात हौस भरलेल्या
मुलीच्या बापांनाही तो आता द्यायचा आहे.हुंडा म्हणजे फक्त पैसे नव्हे,आता हुंड्यानं आपलं रुप बदललं आहे,
हुंडा म्हणजे हनिमूनचं पॅकेज ‘टेम्परवारी’ नोकरी परमनण्ट करण्यासाठी चिरीमिरीची व्यवस्था, काही लाखांची फक्त मदत, ती ही इच्छेने, नाईलाजानं नव्हे!
आपल्या मुलीच्या वाट्याला शेतीमातीतले कष्ट येऊ नयेत म्हणून नोकरीवाल्या- शहरी मुलाच्या स्थळाची खरेदीही हुंडा देऊन होते! हे सारं ‘आजचं’ चित्र आहे, ते ही आपल्याच राज्याचं? यावर विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे.
महाराष्ट्रभरातून- त्यातही खेड्यापाड्यातून ‘आॅक्सिजन’ला आलेली 3690 पत्रं आणि
700हून अधिक इमेल्स तरी हेच सांगतात..
‘देणारे’ हौसेनं हुंडा देताहेत,
‘घेणारे’ तो आनंदानं घेताहेत.
- छळ आहे तो फक्त खर्चाची हौस न परवडणाऱ्यांचा
आणि नव्या वाटेने चालू पाहातील, त्या तरुणांचा!
हुंड्याच्या याच गडबडगुंड्याचा एक विशेषांक,
येत्या शुक्रवारचा ‘आॅक्सिजन’