एक डझनमध्ये १२ वस्तूच का मिळतात? १० किंवा १५ का नाहीत, असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 01:01 PM2023-05-23T13:01:57+5:302023-05-23T13:02:19+5:30
Dozen: एक डझनामध्ये केवळ बाराच अंडी आणि केळी का मिळतात, दहा किंवा पंधराचा हिशोब का केला जात नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसल्यास आम्ही तुम्हाला सांगतो.
आतापर्यंत तुम्ही अनेकदा केळी, अंडी किंवा इतर वस्तू डझनामध्ये खरेदी केल्या असतील. काही वस्तूंचा व्यवहार हा डझनामध्येच होतो. म्हणजेच जर तुम्ही केळी किंवा अंडी खरेदी केली तर दुकानदार या वस्तू डझनाच्या हिशोबानेच देतो. मात्र एक डझनामध्ये केवळ बाराच अंडी आणि केळी का मिळतात, दहा किंवा पंधराचा हिशोब का केला जात नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसल्यास आम्ही तुम्हाला सांगतो.
एका डझनामध्ये १२ वस्तू मिळण्यामागे दोन मुख्य मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह म्हणजे म्हणजे Duodecimal System of Counting. आधीचे लोक कुठलीही वस्तू मोजण्यासाठी आपल्या शरीरातील अवयवांचा वापर करायचे. उदाहरणार्थ बोटांचा वापर केला जात असे. जर तुम्ही तुमच्या बोटांच्या जॉईंट्सची मोजणी केली तर त्याचा नंबर १२ इतका भरतो. त्याचाच वापर करता करता डझन ही संकल्पना पुढे आली.
याबाबतच्या दुसऱ्या थिअरीची विचार केल्यास १० किंवा १५ च्या तुलनेत १२ वस्तूंचे समप्रमाणात वाटप करणं खूप सोपं होतं. एक डझन वस्तूंचे दोन गटात किंवा तीन किंवा चार गटात वाटप करता येते.
आता तुम्हाला एक डझनच्या १/४ केळी हवी असतील तर दुकानदार तुम्हाला ३ केळी देऊ शकतो. तर अर्धा डझन केली मागितल्यावर तु्म्हाला दुकानदार ६ केली देतो. मात्र एका डझनामध्ये १० किंवा १५ केळी असती तर केळेवाल्या तेवढी केळी देणं शक्य झालं नसतं. त्यामुळेत एक डझनामध्ये अंडी किंवा केळी ह्या वस्तू १२च्या प्रमाणात दिल्या जातात.