उपचाराच्या प्रतिक्षेत बसले होते रुग्ण, अचानक गायब झाली डॉक्टर; नर्सनं शोधलं तेव्हा ती गाढ झोपली होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 19:56 IST2021-09-03T19:53:03+5:302021-09-03T19:56:22+5:30
३३ वर्षीय डॉक्टर रायशाह सेवाती ग्रेटर मैनचेस्टरच्या फेयरफिल्ड रुग्णालयात नाइट ड्युटीला कामाला होती.

उपचाराच्या प्रतिक्षेत बसले होते रुग्ण, अचानक गायब झाली डॉक्टर; नर्सनं शोधलं तेव्हा ती गाढ झोपली होती
लंडन – एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारातून मुक्त करणं आणि जीवदान देणं हे डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य असतं. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन रुग्णांची सेवा केली. अक्षरश: काही डॉक्टरांनी रुग्णांना वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली. परंतु ब्रिटनमध्ये सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल होतोय. ज्यावर लोकांनी अनेक कमेंट्स करुन नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनच्या एका हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुग्णांना डॉक्टरची गरज होती तेव्हा अचानक डॉक्टर गायब झाली.
द सनच्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय डॉक्टर रायशाह सेवाती ग्रेटर मैनचेस्टरच्या फेयरफिल्ड रुग्णालयात नाइट ड्युटीला कामाला होती. यावेळी काही रुग्ण डॉक्टरांच्या प्रतिक्षेत हॉस्पिटलबाहेर ताटकळत बसले होते. रुग्णालयातील नर्सही डॉक्टरांना शोधत होत्या. इतकचं नाही तर डॉक्टर कुठेही दिसत नसल्याने चक्क अनाउंसमेंट केली तरीही काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे रुग्णालयात गोंधळ माजला. डॉक्टर दिसत नसल्याने उपचारासाठी आलेले पेंशट्सही नाराज झाले होते.
त्यानंतर रुग्णालयातील एका नर्सनं फिमेल चेंजिग रुमध्ये पोहचली तेव्हा बेंचवर चादर पांघरुन कुणीतरी झोपलेलं दिसलं. चादर हटवल्यानंतर ती डॉक्टर रायशाह सेवाती असल्याचं नर्सला दिसलं. महिला डॉक्टरच्या अशा बेजबाबदार वागणुकीमुळे मेडिकल ट्रिब्यूनलने त्यांच्या कारवाई केली आहे. डॉक्टर रायशाह सेवाती या बेजबाबदार डॉक्टर असल्याचा ठपका मेडिकल ट्रिब्यूनलने ठेवला आहे. डॉक्टरच्या अशा वागण्यानं त्यांना हॉस्पिटलमधून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत मेडिकल ट्रिब्यूनलनं नर्सचा जबाब नोंदवला आहे.
नर्सनं जबाबात म्हटलंय की, मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये असं पहिल्यांदाच पाहिलं आहे जेव्हा डॉक्टर रुग्णांना सोडून झोपण्यास गेले आहेत. डॉ. रायशाह सेवाती यांच्यावर हा पहिलाच आरोप नाही तर याआधीही त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. २०१२ मध्ये पदवीधर झालेल्या डॉक्टर सेवातीने तिच्या स्वभावामुळे अनेकदा टीका सहन करावी लागली आहे. तरीही तिच्यात बदल झाला नाही. २०१५ मध्ये एकाठिकाणी काम करताना ती दुपारच्या वेळी ऑनकॉल झोपली होती.
कोर्टात दिलं आव्हान
डॉक्टर सेवाती हिने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली परंतु ती झोपलेली नव्हती असा दावा तिने केला आहे. त्यानंतर तिची बदली फेयरफिल्ड रुग्णालयात केली. तिथेही ती झोपलेली आढळली. सावतीच्या बचावासाठी एका ज्येष्ठ डॉक्टरांनी तिची शिफ्ट बदलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तिला आराम मिळेल. परंतु सावतीच्या दाव्याला त्या डॉक्टरांनी खोटं ठरवलं आहे. सध्या या प्रकऱणावरुन आरोपी डॉक्टर रायशाह सेवातीनं कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.