स्वप्नांना वयाची मर्यादा नसते! ८३ व्या वर्षी खरेदी केली नवी कार; किस्सा वाचून तुम्हीही इमोशनल व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:16 PM2022-02-09T16:16:59+5:302022-02-09T16:17:14+5:30

८३ वर्षांच्या आजोबांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल.

Dreams have no age limit Bought a new car at the age of 83 you will feel emotional after reading his story | स्वप्नांना वयाची मर्यादा नसते! ८३ व्या वर्षी खरेदी केली नवी कार; किस्सा वाचून तुम्हीही इमोशनल व्हाल

स्वप्नांना वयाची मर्यादा नसते! ८३ व्या वर्षी खरेदी केली नवी कार; किस्सा वाचून तुम्हीही इमोशनल व्हाल

Next

जेव्हा एखादी व्यक्ती कमावण्यास सुरूवात करते तेव्हा आपल्याकडे आपल्या मालकीचं एखादं घर असावं, आपली एखादी गाडी असावी अशी अनेक स्वप्न उराशी असतात. अनेकदा आपण प्रयत्न करूनही ते मिळवण्यास खुप वेळ लागतो. याचचं एक उदाहरण म्हणजे ८३ वर्षांच्या आजोबांनी पहिल्यांदाच कारच्या शोरुममध्ये जाऊन नवी कार विकत घेतली. त्यांची हा प्रवास ऐकून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

८३ वर्षीय आजोबांनी कायमच आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पैसे वाचवले आणि जुनी कारच खरेदी केली. परंतु आपल्या जिवनात पहिल्यांदाच स्वत:ची नवी कार पाहून ते अतिशय खुश दिसले. त्यांची ही गोष्ट ह्युमन्स ऑफ बॉम्बेनं (Humans Of Bombay) आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तसंच ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर यावर लाखांत व्ह्यूजही मिळाले आहेत. आपलं आयुष्य कायमच कुटुंबाची मदत करण्यात गेलं. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि कुटुंबियांचं पालनपोषण करणं यालाच कायम प्राधान्य दिल्याचं मुंबईत राहणाऱ्या आजोबांनी सांगितलं. आपल्याला गाड्यांची आवड होती. परंतु पैसे वाचवण्यासाठी कायमच सेकंड हँड कार्स खरेदी केल्याचंही ते म्हणाले.


मुलांच्या सांगण्यावरुन घेतला निर्णय
सहा महिन्यांपूर्वी मी पुन्हा एकदा जुनी कार खरेदी करण्याचा विचार केला. त्यावेळी आपल्या मुलांनी नवी कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केलं. मुलांनी सांगितलेल्या गोष्टीवरही विचार केला आणि त्यानंतर नवी कार घेण्याचा आपण निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. परंतु यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी ग्रे रंगाची एक Maruti Suzuki Wagon-R बुक केली. तसंच मुलांनी त्या गाडीच्या डिलिव्हरीच्या तारखेबद्दल त्यांना सांगितलं नाही. परंतु १६ जानेवारी रोजी त्यांच्या नातवाच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना लंचसाठी नेण्यात आलं.

परंतु त्यानंतर घरी येण्याऐवजी त्यांना मुलांनी मारुतीच्या शोरुममध्ये नेलं. तसंच आपल्या डोळ्यासमोर आपली नवी कार उभी असल्याचं पाहून त्यांनाही आश्चर्य झालं. यानंतर ते आजोबा अतिशय भावूक झाले. आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेण्यासोबतच लोणावळ्याचीही एक ट्रिप करायची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Dreams have no age limit Bought a new car at the age of 83 you will feel emotional after reading his story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.