दूध पिणं चांगलं मानत नाहीत 'या' देशातील लोक, कारण वाचून व्हाल थक्क...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:17 PM2024-04-05T12:17:06+5:302024-04-05T12:18:08+5:30
जगात असाही एक असाही देश आहे जिथे दूध पिणं चांगलं मानलं जात नाही. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दूध किती फायदेशीर ठरतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लहान मुलांसोबतच बऱ्याच मोठ्या व्यक्तीही रोज दुधाचं सेवन करतात. भारतात तर दुधाचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर केला जातो. पण जगात असाही एक असाही देश आहे जिथे दूध पिणं चांगलं मानलं जात नाही. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
ज्या देशात दूध पिणं चांगलं मानलं जात नाही. तो देश म्हणजे चीन आहे. तसे तर चीनमधील लोक काहीही खातात आणि ते त्यांना पचतं सुद्धा. पण येथील लोक दूध पचवू शकत नाहीत. त्यामुळे इथे पिणं नुकसानकारक मानलं जातं. हे काही आतापासून नाही तर खूप आधीपासून मानलं जातं.
चीनमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोक लॅक्टोज इनटॉरेंट आहेत. म्हणजे ते दूध पचवू शकत नाहीत. रिसर्चनुसार, ही समस्या येथील लोकांच्या डीएनएमुळे होते. ज्यामुळे त्यांना जन्मताच दूध पचवणं अवघड होतं. पण प्रश्न हा आहे की, साप, विंचू, झुरळ, वटवाघळं पचवणारे येथील लोक दूध का पचवू शकत नाहीत?
कारण...
दूध किंवा दुधापासून तयार पदार्थांच्या अपचनाला लॅक्टोस इनटॉलरेंस म्हटलं जातं. लॅक्टोज दुधात आढणारी शुगर आहे. जे लोक दूध पचवू शकत नाहीत ते मुळात यात आढळणारी शुगर पचवू शकत नाहीत. त्यांच्या छोट्या आतड्यांमध्ये लॅक्टोज पचवणारे एंजाइम्स तयार होत नाहीत.
एका माहितीनुसार, दूध प्यायल्यानंतर 30 मिनिट ते 2 तासात पोटदुखी, उलट्या, जांभई येणे, पोटात गुडगुड आवाज येत असेल किंवा डायरिया अशी समस्या होते. असंही आढळलं आहे की, भौगोलिक संरचनेच्या आधारावर लॅक्टोज इनटॉलरेंस कमी-जास्त होत राहतं. आशियातील लोकांमध्ये हे जास्त आढळतं. तर यूरोपियन देशांमध्ये ही समस्या फार कमी आहे. आशियात चीनमध्ये ही समस्या जास्त आहे.