तरूणाने खरेदी केली अडीच कोटी रूपयांची कार, शोरूमच्या बाहेर निघताच झाला गंभीर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 01:31 PM2022-04-02T13:31:31+5:302022-04-02T13:36:41+5:30

Ferrari Car Crash: Metro च्या वृत्तानुसार, इंग्लंडचा राहणारा एका तरूण काही वर्षांपासून पैसे जमा करत होता. मोठ्या मेहनतीने पैसे जमा केल्यावर तो त्याची ड्रीम कार खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गेला.

Driver crashes 2 5 crore rupees ferrari car after driving less than 3 kilometer | तरूणाने खरेदी केली अडीच कोटी रूपयांची कार, शोरूमच्या बाहेर निघताच झाला गंभीर अपघात

तरूणाने खरेदी केली अडीच कोटी रूपयांची कार, शोरूमच्या बाहेर निघताच झाला गंभीर अपघात

Next

Ferrari Car Crash: काही लोकांचं नशीब फारच चांगलं असतं तर काही लोकांचं नशीब फार खराब असतं. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणात आहोत, ज्याच्यासारखं क्वचितच कुणाचं नशीब खराब असेल. या व्यक्तीने मोठ्या मेहनतीने अडीच कोटी रूपये जमा केले आणि त्यातून फरारी कार खरेदी केली होती. पण शोरूमच्या बाहेर निघताच कारचा अपघात झला आणि अडीच कोटी रूपये पाण्यात गेले.

Metro च्या वृत्तानुसार, इंग्लंडचा राहणारा एका तरूण काही वर्षांपासून पैसे जमा करत होता. मोठ्या मेहनतीने पैसे जमा केल्यावर तो त्याची ड्रीम कार खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गेला. शोरूममधून त्याने नवीकोरी फरारी ४८८ कार खरेदी केली. या कारची किंमत अडीच कोटी रूपये होती. आपली ड्रीम कार घेऊन तरूण फार आनंदी होता. यानंतर कार शोरूममधून काढून तो घराकडे निघाला.

पण तरूणाचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. कारण शोरूममधून निघाल्यावर केवल ३ किलोमीटर पुढे जाऊन कारचा गंभीर अपघात झाला. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने तरूणाला यात फार काही झालं नाही. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. पण अडीच कोटीची कार मात्र बेकार झाली. डर्बीशायर पोलिसांनी त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंटवर याचे फोटो शेअर केले. ही घटना एक एप्रिलची आहे.

एप्रिल फूलच्या दिवशी फोटो शेअर केल्याने लोकांना यावर सहज विश्वास बसला नाही. अनेकांना हेच वाटलं की, अडीच कोटीच्या कारचा घेतल्यावर अपघात झालाच नाही. लोकांना वाटलं पोलीस त्यांना एप्रिल फूल बनवत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तरूण फरारी ४८८ कार खरेदी करून शोरूममधून केवळ ३ किलोमीटर दूरच गेला होता. 
 

Web Title: Driver crashes 2 5 crore rupees ferrari car after driving less than 3 kilometer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.