चालकाने २० वर्षांपूर्वी पार्क केलेली कार सापडली भंगारात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 04:13 PM2017-11-20T16:13:26+5:302017-11-20T16:23:45+5:30

एवढ्या मोठ्या पार्किंगमध्ये आपली गाडी कुठे पार्क केलीये हा प्रत्येक वाहनचालकाला पडलेला प्रश्न असतो.

driver got his car after 20 years in parking | चालकाने २० वर्षांपूर्वी पार्क केलेली कार सापडली भंगारात

चालकाने २० वर्षांपूर्वी पार्क केलेली कार सापडली भंगारात

Next
ठळक मुद्देएखाद्या  ठिकाणी पार्क केलेली गाडी टोईंग व्हॅनही उचलून नेऊ शकते.हरवलेली गाडी बऱ्याच शोधानंतरही गाडी सापडली नाही की सगळेच पोलिसात तक्रार दाखल करतात. याहीनंतर न सापडलेल्या गाडीचा शोध थांबवून देणंच चांगलं असतं.

फ्रँकफर्ट - आपण आपली गाडी नेमकी कुठे पार्क केलीय हे लक्षात ठेवणं हे सगळ्याच चालकांसाठी तसं फार कठीण काम असतं. एखाद्या  ठिकाणी पार्क केलेली गाडी टोईंग व्हॅनने तर उचलून नेली नाही ना, किंवा कोणी चोरीला तर नेली नाही ना असे अनेक प्रश्न चालकाला पडतात. मात्र बऱ्याच शोधानंतरही गाडी सापडली नाही की सगळेच पोलिसात तक्रार दाखल करतात. पण एकदा हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू ज्याला मिळते त्याला नशिबवानच म्हणायला हवं. त्याचप्रमाणे १९९७ साली हरवलेली गाडी आता चालकाला सापडली आहे, पण ही गाडी हरवली नसून नेमकी कुठे पार्क केली होती हेच चालक विसरला होता, त्यामुळे गाडी हरवल्याची तक्रार देण्यात आली होती, असा निर्वाळा या चालकाने दिला आहे. मात्र गाडी आता भंगारात देण्याच्याच पात्रतेची उरली आहे.

जर्मनच्या फ्रँकफर्ट या शहरातील एका गॅरेजमध्ये एका चालकाने १९९७ साली गाडी पार्क केली होती. आपलं काम उरकून आल्यावर गाडी नेमकी कुठे पार्क केलीय हेच चालकाला आठवेना. त्याला जिथे जिथे आठवत होतं, तिथे तिथे चालकाने गाडी शोधली. मात्र तरीही गाडी  काही सापडली नाही. गाडी शोधून थकल्यावर शेवटी त्याने पोलिसात तक्रार दाखल करायचं ठरवलं. गाडी हरवल्याची तक्रार त्याने पोलिसात दाखल केली. मात्र त्यानंतरही बरीच वर्ष ही गाडी काही सापडली नाही. पण आता तब्बल २० वर्षांनंतर ही गाडी सापडली आहे. एका इंडस्ट्रियल इमारतीमध्ये असलेल्या गॅरेजमध्ये ही गाडी आढळली.

ही इमारत तोडताना कामगारांना ही गाडी सापडली. त्यानुसार इमारतीच्या मालकाने याबाबत पोलिसात कळवलं. पोलिसांनी या गाडीचा अधिक तपास केला असता ही गाडी एका ७६ वर्षीय इसमाची असल्याचं कळलं. त्वरीत त्या माणसाशी संपर्क साधून गाडीविषयी सांगण्यात आलं. २० वर्षांपूर्वी हरवलेली गाडी  गॅरेजमध्ये सापडली असं पोलिसांनी सांगितल्यानंतर या चालकाला आठवलं की गाडी चोरीला गेली नव्हतीच, गाडी मीच तिकडे विसरून आलो होतो. पण आता २० वर्षांनी ही गाडी सापडूनही काहीच उपयोग नाही. कारण ही गाडी वापरण्या लायक राहिली नसून ती भंगरात देणंच उचित ठरेल.

सौजन्य - www.mirror.co.uk

Web Title: driver got his car after 20 years in parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.