काय सांगता? गंभीर गुन्ह्यासाठी मांजरीला केली अटक पण झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:56 PM2020-08-04T15:56:12+5:302020-08-04T16:06:18+5:30

गंभीर गुन्ह्यासाठी एका मांजरीला अटक करण्यात आली आहे.

drug smuggling cat jailed escapes cell | काय सांगता? गंभीर गुन्ह्यासाठी मांजरीला केली अटक पण झालं असं काही...

काय सांगता? गंभीर गुन्ह्यासाठी मांजरीला केली अटक पण झालं असं काही...

Next

जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असतानाचा अनेक अजब घटना समोर येत आहेत. गंभीर गुन्ह्यासाठी श्रीलंकेत चक्क एका मांजरीला अटक करण्यात आली आहे. मात्र अटकेनंतर अवघ्या काही वेळात मांजर फरार झाली आहे. पोलिसांची नजर चुकवून जेलमधून पळ काढण्यात ती यशस्वी झाली. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ड्रग आणि सिम कार्डच्या तस्करीसाठी मांजरीचा वापर करण्यात येत होता. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळाल्यावर त्यांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरीजवळ दोन ग्राम हेरोईन, 2 सिम कार्ड आणि एक मेमरी चिप सापडली आहे. मांजरीच्या गळ्यात एक पाकीट बांधलं होतं. ज्यामध्ये हे सामान ठेवण्यात आलं होतं. मांजर सापडल्यावर तिला अटक करण्यात आली आणि जेलमध्ये ठेवण्यात आलं. मात्र मांजरीने जेलमधून पळ काढला आहे. श्रीलंका ड्रग सारख्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. गेल्या आठवड्यातही श्रीलंकेतील पोलिसांनी कोलंबोमध्ये एका गरुडाला पकडलं होतं. तस्करीसाठी गरुडाचा वापर केला जात होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कानपूरमध्ये देखील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चक्क एका बकऱ्यावर कारवाई केली होती. वीकेंड लॉकडाऊन दरम्यान मास्कशिवाय फिरणाऱ्या एका बकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यानंतर बकऱ्याच्या मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुझ्या बकऱ्याला घरातच ठेव. त्याला बाहेर सोडू नको, असा सल्ला पोलिसांनी बकऱ्याच्या मालकाला दिला. त्यानंतर बकऱ्याची सुटका झाली. पोलिसांनी केलेल्या हास्यास्पद कारवाईचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लय भारी! फक्त 30 सेकंदांत आवाजावरून समजणार कोरोना आहे की नाही?, जाणून घ्या कसं

CoronaVirus News : लढ्याला यश! Jubilant ने लाँच केलं कोरोनावरचं औषध, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा

Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या...

 

Web Title: drug smuggling cat jailed escapes cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.