खेळण्याच्या बॉक्समध्ये निघाले अमलीपदार्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 03:10 AM2019-08-11T03:10:43+5:302019-08-11T03:10:52+5:30
जॉर्जियामधील एक महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींनी दक्षिण कॅरोलिनातील एका दुकानात गेल्या. महिलेने मुलासाठी खेळण्याचा बॉक्स विकत घेतला.
जॉर्जियामधील एक महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींनी दक्षिण कॅरोलिनातील एका दुकानात गेल्या. महिलेने मुलासाठी खेळण्याचा बॉक्स विकत घेतला. घरी गेल्यानंतर तो बॉक्स उघडला जाताच महिला हादरली. मुलाने तो उघडला, तेव्हा त्याला खेळण्यांखाली मेथॅम्फेटाइन नामक अमलीपदार्थाची पिशवी दिसली. त्याची किंमत ४० हजार डॉलर्स आहे.
महिलेने घाईघाईने शेरीफ कार्यालयाकडे तो बॉक्स पाठविला. या कार्यालयाने अमलीपदार्थविरोधी विभागाच्या पथकाला बोलावले. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही त्या दुकानदाराकडे दोन तास चौकशी केली. त्यातून नवीनच बाब उाड झाली.
अमलीपदार्थ विक्रेत्यांच्या या अजब शक्कलविषयी आश्चर्य व्यक्त करून तपास अधिकारी म्हणाला, रिग्ज प्रथमच आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ सापडला आहे. बॉक्सच्या आतील मेथॅम्फेटामाइन निर्वात पोकळीत बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उग्र वास कोणालाच आला नाही.
अमलीपदार्थ विक्रेत्यांनी चुकीच्या पत्त्यावर बॉक्स पाठविला असावा. असे विक्रेते बहुतेक वेळा जी घरे रिकामी आहेत, अशा पत्त्यांवर अमलीपदार्थ पाठवितात. मात्र टपाल कर्मचारी तो बॉक्स शेजाऱ्यांकडे देतात वा त्याच्यावर कोणी दावा न केल्यास, त्याचा लिलाव करतात. दरम्यान, बुलोच काउंटी शेरीफच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.