आपल्याच लग्नात दारू पिऊन टल्ली झाली नवरी, टॉयलेट सीटमध्ये तोंड टाकून बसली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:00 PM2023-04-07T12:00:41+5:302023-04-07T12:01:18+5:30
नवरी आपल्या लग्नात इतकी दारू प्यायली की, टॉयलेटच्या सीटमध्ये तोंड टाकून ती उलटी करत होती.
प्रत्येक तरूण आणि तरूणींना आपलं लग्न यादगार करायचं असतं. नवरी-नवरदेवाकडून लग्नाच्या दिवशी अपेक्षा केली जाते की, त्यांनी शांत, सभ्य वर्तन करावं. पण जर लग्नाच्या दिवशीच नवरी दारू पिऊन टल्ली झाली तर काय होईल? अर्थातच तिला बघू सगळ्यांना धक्का बसेल. असाच एक नजारा अमेरिकेतील एका लग्नात बघायला मिळाला. नवरी आपल्या लग्नात इतकी दारू प्यायली की, टॉयलेटच्या सीटमध्ये तोंड टाकून ती उलटी करत होती.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, साऊथ कॅरोलीना इथे राहणारी मॅकेंजी ग्रिमस्ले (Mackenzie Grimsley) नावाच्या एका 24 वर्षीय तरूणीन 24 मार्चला ब्राडेन नावाच्या तरूणासोबत लग्न केलं. इतरांसारखं त्यांनाही वाटत होतं की, लग्न यादगार व्हावं. पण जरा गोंधळ झाला, ज्यामुळे लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली.
लग्नात टल्ली झाली नवरी
मग काय दारू प्यायल्यानंतर तिची अशी काही हालत झाली की, ती सगळं काही विसरली आणि नशेत टल्ली झाली. तिला बघून पाहुणेही हैराण झाले. पण तिच्या पतीने तिची साथ सोडली नाही. ती इतकी दारू प्यायली होती की, नंतर ती उलट्या करू लागली होती. व्हिडिओमध्ये ती टॉयलेटच्या कमोडमध्ये तोंड टाकून उलट्या करताना दिसत आहे. तिचा पतीही तिच्यासोबत आहे.
व्हायरल झाले लग्नाचे फोटो
इन्स्टावर पती आणि पत्नी दोघेही फेमस आहेत. पतीचे 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर पत्नीचे 6 लाख फॉलोअर्स आहेत. दोघांनी इन्स्टावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. न्यूयॉर्क पोस्टनुसार, लोक त्यांच्या टिकटॉक पोस्टवर कमेंट करत आहेत. या व्हिडिओला 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.