मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:33 AM2023-01-24T10:33:11+5:302023-01-24T10:33:46+5:30

Order Biryani From Bangalore : मुंबईत राहणाऱ्या या तरूणीने जेव्हा जेवण ऑर्डर केलं तेव्हा ती नशेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणीने बिर्याणी तर ऑर्डर केली, पण तिने चुकून बंगळुरूहून ऑर्डर केली.

Drunk Mumbai girl order biryani from Bangalore what happened then | मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का

मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का

googlenewsNext

Order Biryani From Bangalore : ऑनलाईन फूड डिलीव्हरीच्या या काळात लोक नेहमीच त्यांच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करतात, पैसे देतात आणि जेवण त्यांच्या घरी पोहोचतं. पण यादरम्यान अनेक मजेदार गोष्टीही घडतात. अशीच एक समोर आली आहे. मुंबईतील एका तरूणीने चुकून बंगळुरूहून बिर्याणी ऑर्डर केली. त्यानंतर जे झालं ते व्हायरल झालंय.

मुंबईत राहणाऱ्या या तरूणीने जेव्हा जेवण ऑर्डर केलं तेव्हा ती नशेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणीने बिर्याणी तर ऑर्डर केली, पण तिने चुकून बंगळुरूहून ऑर्डर केली. त्यानंतर तरूणीची आर्डर रिसीव सुद्धा झाली. पण जेव्हा याची किंमत समोर आली तेव्हा तरूणीला तिने काय केलं हे समजलं.

तरूणीने बिर्याणी बंगळुरूच्या प्रसिद्ध मेघना फूड्समधून डिलीव्हरी मागवली होती. 2500 रूपयांची बिर्याणी तरूणीच्या घरी पोहोचली, जेव्हा तिला नेमकं काय झालं याची जाणीव झाली. तिने बिलाचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पण ती पोस्ट आता दिसत नाहीये. तरूणीने ऑर्डरचा स्क्रीनशॉट तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता.

तरूणी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, मी काय नशेत होते ही बिर्याणी ऑर्डर केली? माझी ऑर्डर बंगळुरूहून येत आहे. ज्याची किंमत 2500 रूपये आहे. तिची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने पोस्ट डिलीट केली होती. पण सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Web Title: Drunk Mumbai girl order biryani from Bangalore what happened then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.