दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 10:01 AM2021-02-05T10:01:30+5:302021-02-05T10:27:09+5:30
ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत.
जगात काही अरब देश हे आपल्या कठोर नियमांसाठी चांगलेच चर्चेत असतात. या देशात एक गंमत तुम्हाला अनेक वर्षांसाठी तुरूंगात पाठवू शकते. अशीच एक घटना दुबईमधून समोर आली आहे. इथे एका ब्रिटिश महिलेला गंमत करणं चांगलंच महागात पडलं आहे.
देश सोडताना घेतलं ताब्यात
या ब्रिटिश महिलेला देश सोडून जाताना एअरपोर्टवरून ताब्यात घेण्यात आलं होतं. कारण तिच्यासोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका यूक्रेनी तरूणीने तक्रार केली होती की, तिला या ब्रिटिश महिलेने 'F*** YOU' असं म्हटलं होतं. केवळ या शब्दामुळे ब्रिटिश महिलेला आता २ वर्षांसाठी तुरूंगात रहावं लागणार आहे. ( हे पण वाचा : बाप रे बाप! दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करणार होता बॉयफ्रेन्ड, महिलेने हत्या करून कुत्र्याला खाऊ घातलं....)
व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्याची शिक्षा
ब्रिटिश महिला ब्रायटोनचं वय ३१ वर्षे आहे आणि ती ग्लूकेस्टरशायर(इंग्लंड) बेस्ड कंपनीमध्ये एचआर मॅनेजर आहे. तिच्यासोबत फ्लॅटमध्ये एका यूक्रेनी तरूणी राहत होती. ब्रिटिश महिलेनुसार ती फार चंचल, चांगली मुलगी आहे. पण ऑक्टोबर महिन्यात ती ब्रिटिश महिला यूक्रेनी तरूणीवर चिडली आणि व्हॉट्सअॅपवरून 'F*** You' असा मेसेज पाठवला होता. कारण लॉकडाऊन दरम्यान तिच्या रूममेटने डायनिंग टेबलवर ऑफिसचं काम केलं होतं. पण तिला हे माहीत नव्हतं की, हा दोन मिनिटांचा राग तिला किती महागात पडणार आहे.
एअरपोर्टवर अटक
ब्रायटोनने सांगितले की, तिने तिच्या फ्लॅटमेटला ऑक्टोबर महिन्यात तो मेसेज पाठवला होता. आणि आता ती दुबई सोडून नेहमीसाठी आपल्या परिवाराकडे ब्रिटनला जात होती. तिचं साहित्यही पाठवलं गेलं होतं. व्हिसाचा काळ संपला होता. तिने फ्लाइटचं तिकिट काढलं आणि एअरपोर्टला पोहोचली.
रूममेटने केस परत घेण्यास दिला नकार
एअरपोर्टवर ती आत जात असतानाच तिला अडवण्यात आलं. तिला सांगण्यात आलं की, तुझ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा सगळा प्रकार समजून घेतल्यावर ब्रिटिश महिलेने यूक्रेनी तरूणीची माफी मागितली आणि केस परत घेण्याची विनंती केली. पण तसं करण्यास तरूणीने नकार दिला. आता ब्रिटिश महिलेला २ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. ही महिला २०१८ पासून दुबईमध्ये राहत होती. पण कधीच तिला काही समस्या आली नव्हती.
ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत. जिथे तुम्हाला छोटीशी गंमत करणंही महागात पडू शकतं.