उंटांसाठीचं जगातलं एकुलतं एक हॉस्पिटल, माणसांच्या हॉस्पिटलपेक्षाही भारी आहेत सुविधा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 04:16 PM2019-12-06T16:16:06+5:302019-12-06T16:25:19+5:30

कुत्रे किंवा इतर जनावरांच्या हॉस्पिटलबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण कधी केवळ उंटांसाठीचं हॉस्पिटल पाहिलंय का? नाही ना? पण दुबईमध्ये असं एक हॉस्पिटल आहे.

Dubai camel hospital is the worlds only such hospital where treating camels | उंटांसाठीचं जगातलं एकुलतं एक हॉस्पिटल, माणसांच्या हॉस्पिटलपेक्षाही भारी आहेत सुविधा!

उंटांसाठीचं जगातलं एकुलतं एक हॉस्पिटल, माणसांच्या हॉस्पिटलपेक्षाही भारी आहेत सुविधा!

googlenewsNext

(Image Credit : reuters.com)

कुत्रे किंवा इतर जनावरांच्या हॉस्पिटलबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण कधी केवळ उंटांसाठीचं हॉस्पिटल पाहिलंय का? नाही ना? पण दुबईमध्ये असं एक हॉस्पिटल आहे. जिथे केवळ उंटांवर उपचार केले जातात. या हॉस्पिटलचं नाव दुबई कॅमल हॉस्पिटल असं आहे. हे अशाप्रकारचं एकुलतं एक हॉस्पिटल आहे.

हे व्हिआयपी हॉस्पिटल तयार करण्यासाठी साधारण ७१ कोटी रूपये खर्च आला. तर याची सुरूवाती २०१७ मध्ये करण्यात आली. आता तर ओमानपासून ते संपूर्ण संयुक्त अबर अमीरातीतील उंटांवर इथे उपचार केला जातो. 

या हॉस्पिटलमध्ये एकूण ६५ मेडिकल स्टाफ आहे. ज्यात परदेशी तज्ज्ञांची टिमही आहे. इथे एकाचवेळी २२ उंटांवर उपचार केला जाऊ शकतो. खास बाब ही आहे की, या हॉस्पिटलमध्ये उंटांवर उपचार करणं फार महागडं आहे. ऑपरेशनसाठी ७१ हजार रूपये तर अल्ट्रासाउंडसाठी आठ हजार रूपये लागतात. 

(Image Credit : saffarinidxb.com)

या हॉस्पिटलमध्ये एक पाच मीटर उंच एंडोस्कोपी मशीन लावण्यात आली आहे. या मशीन जगभरात केवळ तीनच आहेत. दोन मशीन्स अमेरिकेत आहेत. त्यातील एकाचा वापर तिथे व्हेल माशांच्या उपचारासाठी केला जातो. तर दुसरी मशीन ही जिराफांसाठी वापरली जाते.

उंटांच्या या हॉस्पिटलमध्ये खासकरून अशाच उंटांवर उपचार केले जातात जे मॅरेथॉन दरम्यान पडून जखमी झालेत आणि जर त्यांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर असेल. अनेकदा तर ऑपरेशन थिएटरमध्ये उंटांना उलटं लटकवून उपचार केले जातात.

मुळात दुबईमध्ये होणार उंटांची शर्यत ही जगभरात प्रसिद्ध आहे. इथे ही शर्यत जिंकणाऱ्या उंटाला कोट्यवधी रूपये मिळतात. याच वर्षी अल मरमूम हेरिटेज फेस्टिव्हलमध्ये उंटांची शर्यत आयोजित करण्यात आली होती. ज्यातील विजयी उंटाच्या मालकाला साधारण २.८६ अब्ज रूपयाचं बक्षिस मिळालं.


Web Title: Dubai camel hospital is the worlds only such hospital where treating camels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.