Video : नादच खुळा! फळांच्या राजाचा रॉयल थाट; भाऊ लँबोर्गिनीतून करतोय आंब्याची डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 03:09 PM2020-06-25T15:09:48+5:302020-06-25T15:17:44+5:30
या ठिकाणी आंब्याची डिलिव्हरी लग्जरीअस लँबोर्गिनी कार मधून केली जाते.
आंबा हा फळांचा राजा आहे. राजाला राजाप्रमाणे ट्रिटमेंट मिळायला हवी ना? आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेकांनी नेहमीपेक्षा कमी प्रमाणात आंब्याची खरेदी केली. तर अनेक विक्रेते घरपोच डिलिव्हरी करत होते. आज आम्ही तुम्हाला असाच एक प्रकार सांगणार आहोत. हा आगळा वेगळा प्रकार दुबईतील आहे. या ठिकाणी आंब्याची डिलिव्हरी लग्जरीअस लँबोर्गिनी कार मधून केली जाते. गल्फ टु डे ने दिलेल्या माहितीनुसार दुबईतील पाकिस्तान सुपर मार्केटने हे पाऊल उचललं आहे. दर गुरुवारी लँबोर्गिनी कार मधून आंब्याची डिलिव्हरी केली जाते.
पाकिस्तानी सुपरमार्केटचे डायरेक्टर मोहाम्मद यासिन यांनी दिलेल्या माहितीनुसार फळांच्या राज्याला राज्याप्रमाणे ट्रिटमेंट मिळायला हवी म्हणून ग्राहकांपर्यंत आंबे पोहोचवण्यासाठी अलिशान कारचा वापर करण्यात येतो. एव्हढंच नाही तर कारमधून डिलिव्हरी पोहोचवल्यानंतर ग्राहकाला या कारचा एक राऊंड मारण्यासाठी सुद्धा नेलं जातं.
फक्त पैसै आणि नाव कमावण्यासाठी नाही तर ग्राहकांमध्ये समाधानाची भावना असावी यासाठी यासिन यांनी ही कल्पना शोधली आहे. लोकांना आनंद मिळवून देणं, त्यांना स्पेशल फिल करून देणं हे आमचं काम असल्याचे यासिन सांगतात. ही संकल्पना सुरू केल्यापासून ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत.
एका दिवसात ७ चे ८ घरांमध्ये आंब्याची डिलिव्हरी केली जाते. लॉकडाऊनमुळे माणसं तसंच लहान मुलं घरात बंद आहेत. त्यामुळे ऑडर बरोबरच लँबोर्गिनीतून कार मधून एक राऊंड मारून आणण्याचं ठरवलं. एका घरात डिलिव्हरी करण्यासाठी १ तास लागतो. दिवसभरात साधारण ७ ते ८ डिलिव्हरीज् केल्या जातात. सोशल मीडियावर लँबोर्गिनीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोकांमध्ये कारबाबत उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आंब्याच्या ऑर्डर्ससुद्धा वाढत आहेत.
सावधान! जास्त वेळ एकाच जागी बसल्याने वाढत आहे कॅन्सरचा धोका; जाणून घ्या रिसर्च
CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण