बदकाच्या डोक्यात घुसला होता बाण, तब्बल तीन महिन्यांनी 'असा' काढला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 02:56 PM2020-07-16T14:56:35+5:302020-07-16T15:03:52+5:30

रिपोर्टनुसार, हे बदक तीन महिन्यांपासून असाच बाण डोक्यात घेऊन जगत होतं. ही घटना चेक रिपब्लिकच्या पिलसेन शहरातील असून हे बदक येथील नदीत आढळून आलं.

Duck with an arrow rescued three months after being shot by crossbow | बदकाच्या डोक्यात घुसला होता बाण, तब्बल तीन महिन्यांनी 'असा' काढला!

बदकाच्या डोक्यात घुसला होता बाण, तब्बल तीन महिन्यांनी 'असा' काढला!

Next

काही लोकांना एका बदक आढळला ज्याच्या डोक्यातून बाण आरपार झाला होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे तरी सुद्धा बदक जिवंत होता. तीन लोकांनी त्याला पकडलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जिथे ऑपरेशन करून बाण डोक्यातून काढण्यात आला. रिपोर्टनुसार, हे बदक तीन महिन्यांपासून असाच बाण डोक्यात घेऊन जगत होतं. ही घटना चेक रिपब्लिकच्या पिलसेन शहरातील असून हे बदक येथील नदीत आढळून आलं. त्याच्यावर एका धनुष्याने वार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

शहरातील एनीमल रेक्क्यू सेंटरचे हेड करेल मेकॉन यांनी सांगितले की, 'आम्ही पहिल्यांदा त्याला एप्रिलमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण ते पळून गेलं होतं. त्यानंतरही आम्ही अनेक प्रयत्न केलेत. प्रत्येकवेळी ते उडून गेलं. या आठवड्यात आम्ही त्याला पकडलं. बाण त्याच्या  मानेतून घुसून डोक्यातून निघाला होता. बाणाचं टोक स्टीलचं होतं. ज्यावर एक फिशिंग लाइन जोडली होती.

कॅरेलने  सांगितले की, 'आम्हाला समजलं होतं की, बदकाचे पंख झडत आहेत. त्यामुळे नवीन पंख येईपर्यंत ते उडू शकत नव्हतं. याचा फायदा घेत आम्ही त्याला पकडलं. यासाठी आम्ही चार जणांनी प्लॅन केला होता. अखेर बदकाला आम्ही पकडले.

नंतर बदकाला स्थानिक पशु चिकित्सालयात नेण्यात आलं. तिथे त्याचा एक्स-रे काढला आणि नंतर फार काळजीपूर्वक बाण डोक्यातून काढण्यात आला. ठीक झाल्यावर पुन्हा त्याला पाण्यात सोडण्यात आलं. मेकन सांगतात की, 'बदकाती ही स्थिती शिकाऱ्यांनी केली असू शकते. पण पुरावे नसल्याने काही सांगता येत नाही. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहे.   

उद्योगपतीला सापडला दुर्मिळ कासव, याला मानलं जातं गुडलक चार्म!

शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...

Web Title: Duck with an arrow rescued three months after being shot by crossbow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.