बोंबला! ५८ लाख रूपयांना विकलं गेलं भिंतीवर चिटकवलेलं एक केळं, पण का रे भौ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:15 PM2019-12-07T15:15:10+5:302019-12-07T15:21:34+5:30
साधारणपणे ६० रूपये, ८० रूपये डझन भावाने तुम्ही अनेक केळी खरेदी केली असेल. पण तुम्ही कधी एका केळ्याची किंमत ८५ लाख रूपये मिळाल्याचं ऐकलंय का?
साधारणपणे ६० रूपये, ८० रूपये डझन भावाने तुम्ही अनेक केळी खरेदी केली असेल. पण तुम्ही कधी एका केळ्याची किंमत ८५ लाख रूपये मिळाल्याचं ऐकलंय का? नाही ना? पण नुकतंच एक केळं ८५ लाख रूपयांना विकलं गेलंय. अमेरिकेतील मायामी बीचवरील आर्ट बेसलमध्ये टेप लावलेलं एक केळं ८५.८१ लाख रूपयांना विकलं गेलं. आता सोशल मीडियात याचा फोटो व्हायरल झाला आहे.
(Image Credit : jaborejob.com)
मुळात हे एक आर्ट वर्क आहे. हे बनाना आर्ट इटलीतील कलाकार मौरिजियो कॅटेलनने तयार केलंय. आर्ट मार्केट वेबसाइट अर्टनेटनुसार, त्यांनी तयार केलेल्या तीन बनाना आर्टपैकी दोनची विक्री झाली आहे. आता एक केळं शिल्लक राहिलं असून त्याची किंमत १.०७ कोटी रूपये ठेवण्यात आली आहे.
पेरोटिन गॅलरीनुसार, हे बनाना आर्ट तयार करणारा कलाकार मोरिजियो कॅटेलनने त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये लावण्यासाठी एक मूर्ती तयार करण्याचा विचार करत होते. त्यानंतर त्यांनी तांबे आणि तांब्याच्या रंगाने पेंट केलेली केळी तयार केली. नंतर एक खरं केळ भिंतीवर टेप लावून चिटकवलं. नंतर हे आर्ट बेसलमध्ये प्रदर्शित करण्यात आलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे केळं मायामीतील एका ग्रोसरी स्टोरने खरेदी केलं. पेरोटिन गॅलरीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, या केळ्याची किंमत हे दाखवते की, आपण कशाप्रकारे मूल्य ठरवतो आणि कशाप्रकारच्या वस्तूंना महत्व देतो.
या बनाना आर्टला 'कॉमेडियन' असं नाव देण्यात आलं आहे. गॅलरीच्या पोस्टनुसार, केळं वैश्विक व्यापाराचं प्रतीक आहे. तसेच याचा वापर गंमत म्हणूनही केला जातो. त्यामुळेच याला इतकी किंमत मिळाली. आता तुम्ही म्हणाल की, यात आर्ट काय आहे? ते तर आम्हाला पण समजलं.