भारीच! कोरोनामुळे नोकरी गेली अन् नाईलाजानं बिझनेस सुरू केला; आता घेतोय लाखोंची कमाई
By manali.bagul | Published: January 27, 2021 07:02 PM2021-01-27T19:02:49+5:302021-01-27T19:10:49+5:30
Viral Trending News in Marathi : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. हातात आलेली नोकरी निघून गेली तरीही त्यानं हार मानली नाही.
(Image Credit- Dainik Bhaskar)
कोरोनाकाळात संपूर्ण जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम झालेला दिसून आला. लॉकडाऊनच्या काळात सारं काही बंद असल्यानं अर्थव्यवस्थेवर ताण आला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे मिळवणं कठीण झालं होतं. अशा स्थितीत अनेक तरूणांनी घराची वाट धरून शेती करायला सुरूवात केली तर अनेकांनी लहान मोठा बिझनेझ टाकला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहोत.
जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेल्या नरेन सराफनं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्याचं स्वप्न ताज हॉटेलमध्ये नोकरी करण्याचं होतं. त्याची त्यासाठी निवडही झाली. मात्र नंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. हातात आलेली नोकरी निघून गेली तरीही त्यानं हार मानली नाही. दैनिक भास्करने याबाबतची माहिती दिली आहे.
सुरूवातीला फक्त 2 महिनेच नरेनची नवी नोकरी चालली. आता मात्र तो महिन्याला एक लाख रुपये कमावत आहे. २३ वर्षाच्या नरेनं सांगितले की, ''हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासादरम्यान तो इंटर्नशिपसाठी जोधपूरच्या उमेद भवनला गेला. तिथं त्याचं काम सगळ्यांना खूप आवडलं. तिथं त्याची प्रोफाईल बनवून ताज हॉटेलला पाठवली गेली. मार्च 2020 मध्ये नरेनची निवडही झाली. सप्टेंबरमध्ये त्याला तिथं जॉईन करायचं होतं. कोरोनामुळं ते सगळं राहून गेलं. हातात असलेली नोकरीही गेली.''गायला सुरूवात करताच कुत्रा-मांजरांसह माणसांनी केलं असं काही; रेहमानने शेअर केला भन्नाट VIDEO
नंतर त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपणच काही तरी बनवून लोकांना चाखायल देऊ. त्यानंतर नरेनने व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही पदार्थ बनवायला सुरूवात केली. त्याने बनवलेले पदार्थ लोकांना खूप आवडले. मग नंतर त्यानं स्वतःचं हॉटेल सुरू करायचं ठरवलं. नरेननं 'आउट ऑफ द बॉक्स' नावाच्या एका रेस्टॉरंटची सुरूवात केली. खास मेन्यू तयार केला. त्यात नॉर्थ इंडियन व्हेज-नॉनव्हेज, साऊथ इंडियन, गाली स्टाइल फिश, कीमा राजमा असेही पदार्थ आहेत. यासह तरुणांच्या चवीला लक्षात घेऊन काबुली कबाब आणि बर्गरही तो बनवत असतो.
बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...
सुरूवातीला बिझनेस सुरू केल्यानंतर ओळखीच्या लोकांपर्यंत ऑर्डर पोहोचवायला सुरूवात केली. नंतर सोशल मीडियाद्वारे अजून ग्राहक त्यानं जोडले. आता नरेनला जवळपास ८ ते १० ऑडर्स येतात. दिवसाला तीन चार हजार रूपये कमाऊन महिन्याला साधारण लाखो रुपये नरेन आता कमावतो.