काय सांगता? ब्रेन सर्जरी करताना मरण येऊ नये म्हणून 'ही' बाई वाचत होती गीतेचे श्लोक, डॉक्टर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 04:36 PM2021-01-01T16:36:04+5:302021-01-01T16:44:57+5:30
Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरचा एका विचित्र प्रकार व्हायरल होत आहे. झालं असं की, एका ३६ वर्षीय रुग्ण महिलेला ब्रेन सर्जरीदरम्यान गीतेचे श्लोक वाचण्यास सांगितले होते.
रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये कोणी गीतेचे श्लोक म्हणू शकतं यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. कारण जेव्हा एखादी व्यक्ती ऑपरेशन थिएटरमध्ये असते तेव्हा खूप गंभीर स्थितीचा सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरचा एका विचित्र प्रकार व्हायरल होत आहे. झालं असं की, एका ३६ वर्षीय रुग्ण महिलेला ब्रेन सर्जरीदरम्यान गीतेचे श्लोक वाचण्यास सांगितले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर्जरी करताना कोणीही गीतेचे श्लोक का बरं म्हणेल? ब्रेन सर्जरी करताना या महिलेला जाग राहण्यास सांगितलं होतं.
सर्जरी करताना मृत्यूचा सामना करावा लागू नये म्हणून ही महीला गीतचे श्लोक वाचत होती.
या रुग्ण महिलेचे नाव दयाबेन भरतभाई बुधेलिया असं आहे. जवळपास सर्वा तास ब्रेन सर्जरी सुरू होती. दयाबेन सुरतच्या रहिवासी आहेत. त्यांच्या मेंदूत गाठ झाल्यामुळे तणाव आला होता. जर योग्यवेळी उपचार घेतले नसते. तर या महिलेला लकव्याचा सामना करावा लागला असता.
PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL
ही सर्जरी २३ डिसेंबरला न्यूरो सर्जन तज्ज्ञ डॉ. कल्पेश शहाकडून करण्यात आली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक कठीण सर्जरी होती. या सर्जरीसाठी रुग्णाचं जाग राहणं फार महत्वाचं होतं. जेव्हा त्यांनी दयाबेन यांना याबाबत माहिती दिली. त्यानंर त्या जाग राहण्यासाठी श्लोक वाचत होत्या.
आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...
डॉ. कल्पेश शाहा यांनी सांगितले की, मी माझ्या जीवनात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत. अशी केस पहिल्यांदाच माझ्या समोर आली होती. रुग्णाला जागं राहण्यासाठी एनेस्थेसिया देण्यात आलं होतं. तीन महिन्यांनंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता.