Video : आपण सूर्यग्रहण बघत होतो तेव्हा मलेशियातील लोक अंडी बॅलन्स करत होते, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:43 PM2019-12-27T15:43:26+5:302019-12-27T15:47:59+5:30

गुरूवारी म्हणजे २६ डिसेंबरच्या सकाळी आशियासह जगभरात सूर्यग्रहणाबाबतची उत्सुकता बघायला मिळाली.

During solar eclipse 2019 Malaysians were busy balancing eggs on street because science say so | Video : आपण सूर्यग्रहण बघत होतो तेव्हा मलेशियातील लोक अंडी बॅलन्स करत होते, पण का?

Video : आपण सूर्यग्रहण बघत होतो तेव्हा मलेशियातील लोक अंडी बॅलन्स करत होते, पण का?

googlenewsNext

गुरूवारी म्हणजे २६ डिसेंबरच्या सकाळी आशियासह जगभरात सूर्यग्रहणाबाबतची उत्सुकता बघायला मिळाली. भारतातही लोक टेरेस किंवा डोंगरावर जाऊन सूर्यग्रहण बघत होते. मात्र, मलेशियातील लोकांनी यावेळी असं काही केलं जे आपण कधीच नसतं केलं. येथील लोकांनी विज्ञानातील एका थेअरीचा प्रयोग केला. हा प्रयोग केवळ सूर्यग्रहणावेळीच शक्य आहे. इथे लोकांनी रस्त्यावर अंडी बॅलन्स करून बघितली. 

विज्ञानातील एक लोकप्रिय सिद्धांत आहे. त्यानुसार, जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो म्हणजे सूर्यावर येतो तेव्हा गुरूत्वाकर्षण वाढतं. या सिद्धांतानुसार, अशा स्थितीत अंड उभं ठेवलं तर ते स्वत:हून बॅलन्स होतं. म्हणजे असं की, सूर्यग्रहण सुरू असताना अंड उभं ठेवलं ते खाली न पडता सरळच राहिलं.

विज्ञानाच्या या सिद्धांतावर पूर्वीपासून वाद आहेत. पण गुरूवारी मलेशियामध्ये लोकांनी यावर प्रयोग केला. मलेशिया आणि इंडोनेशियातील सोशल मीडिया यूजर्सनी फोटो शेअर केले आहेत. यात हा त्यांनी केलेला प्रयोग बघायला मिळतोय. 


Web Title: During solar eclipse 2019 Malaysians were busy balancing eggs on street because science say so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.