क्या बात! लोकांची शेवटची इच्छा पूर्ण करणारं जोडपं, जमेल ते करून १४ हजार लोकांची केली मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 01:52 PM2020-02-05T13:52:51+5:302020-02-05T13:58:44+5:30

म्हातारपणी मरणाच्या प्रतिक्षेत असताना काय काय राहून गेलं या गोष्टींची विशेष आठवण होते.

Dutch couple helps 14000 terminally ill patients fulfil dying wishes | क्या बात! लोकांची शेवटची इच्छा पूर्ण करणारं जोडपं, जमेल ते करून १४ हजार लोकांची केली मदत!

क्या बात! लोकांची शेवटची इच्छा पूर्ण करणारं जोडपं, जमेल ते करून १४ हजार लोकांची केली मदत!

googlenewsNext

आयुष्यभर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, नोकरी करत असताना बरंच काही मागे राहून जातं. म्हातारपणी मरणाच्या प्रतिक्षेत असताना काय काय राहून गेलं या गोष्टींची विशेष आठवण होते. तेव्हा अनेकजण असाही विचार करतात की, तेव्हा हे केलं असतं, तेव्हा ते केलं असतं तर बरं झालं असतं. पण वेळ निघून गेलेली असते. मात्र, अशाच लोकांच्या मनातील गोष्टी पूर्ण करण्यासाठी एक कपल वाट्टेल ते करायला तयार असतं.

नेदरलॅंडमधील एक कपल लोकांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम अनेक वर्षांपासून करत आहे. ६० वर्षीय फीस वेल्बोबोर आणि त्यांची पत्नी इंके(६१) अ‍ॅम्बुलन्स विश फाउंडेशन चालवतात. वल्दोबोर एक पॅरामेडिको होते. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनी मिळून आतापर्यंत १४ हजार लोकांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कीस वेल्दोबोर यांनी या कार्याला सुरूवात तेव्हा केली जेव्हा ते एका रूग्णाला अॅम्बुलन्सने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. त्यावेळी त्यांनी रूग्णाला विचारले की, तुम्हाला शेवटच्या क्षणात कुठे जगायचं आहे? तेव्हापासूनच कीस यांनी लोकांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याला आपलं ध्येय बनवलं.

कीस यांनी सांगितले की, त्या रूग्णासोबत बोलल्यानंतर एका वर्षाने मी फाउंडेशनची सुरूवात केली. रूग्णांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते रूग्णांना बर्फाळ प्रदेशात, डोंगरांवर, फुटबॉल मॅच दाखवायला , समुद्र किनारी, कार रेसकोर्स, प्रदर्शनी, प्राणी संग्रहालय या ठिकाणांवर घेऊन गेले आहेत'.

कीस वेल्दोबोर यांनी साधारण २० वर्षे एका हॉस्पिटलमध्ये अ‍ॅम्बुलन्स चालवली. नंतर त्यांनी स्वत:ची अ‍ॅम्बुलन्स खरेदी केली. आता त्याद्वारेत ते लोकांची मदत करतात. या कामाने त्यांना चांगलं वाटतं. त्यांनी सांगितले की, एकदा एका आजारी तरूणाला त्याच्या घरून स्वित्झर्लॅंडमधील डोंगर दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो. कीस या वयातही दिवसाला सहा गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णांची मदत करतात.

 


Web Title: Dutch couple helps 14000 terminally ill patients fulfil dying wishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.