बापरे! जंगल सफारीमध्ये टॉयलेटला जाणं जीवावर बेतलं; डॉक्टरही म्हणाले, असं पहिल्यांदाच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 10:25 AM2021-11-06T10:25:25+5:302021-11-06T10:31:08+5:30

दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट जंगलात विषारी साप मोठ्या प्रमाणात आहेत. जराही निष्काळजीपणा केला तर तुमच्या जीवावर संकट ओढावू शकतं.

Dutch man bitten by snake Cobra while sitting on the toilet during a safari tour in South Africa | बापरे! जंगल सफारीमध्ये टॉयलेटला जाणं जीवावर बेतलं; डॉक्टरही म्हणाले, असं पहिल्यांदाच घडलं

बापरे! जंगल सफारीमध्ये टॉयलेटला जाणं जीवावर बेतलं; डॉक्टरही म्हणाले, असं पहिल्यांदाच घडलं

Next

केप टाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात सफारी करण्यासाठी गेलेल्या पर्यटकाला तो क्षण चांगलाच महागात पडला आहे. त्या व्यक्तीला आणि प्रायव्हेट पार्टला वाचवण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करायला लागली. ४७ वर्षीय पर्यटक जंगल सफारीच्या वेळी टॉयलेटचा वापर करत होता. त्यावेळी जी घटना घडली त्याने सगळेच अवाक् झाले. या दुर्घटनेनंतर पर्यटकाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

३ तासानंतर हॉस्पिटलला पोहचला

मिररच्या रिपोर्टनुसार, जंगल सफारीला गेलेला पर्यटक टॉयलेटसाठी बसला होता तेव्हा अचानक एका कोबरा सापानं व्यक्तीला दंश दिला. जवळपास ३ तास तो त्याच अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. त्यानंतर गार्डने त्याला ३५० किमी अंतरावर असलेल्या एका ट्रॉमा सेंटरला उपचारासाठी नेले. तोपर्यंत सापाचं विष व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टपासून छातीपर्यंत पोहचलं होतं. प्रायव्हेट पार्टला जळजळणे आणि प्रचंड वेदना सुरु झाल्या. कदाचित ही पहिलीच घटना आहे ज्यात कोबरानं व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला दंश दिला असेल असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रायव्हेट पार्टचा रंगच बदलला

जखमी पर्यटकाला हॉस्पिटलला नेईपर्यंत त्याचा प्रायव्हेट पार्ट आणि आसपासची जागा सुजली होती. त्याचा रंगही बदलल्याचं डॉक्टर म्हणाले. पीडित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तातडीने सर्जरी करायला लागली. ट्रॉमा सेंटरचे डॉक्टर म्हणाले की, याआधी अशी घटना कधीही घडली नव्हती. एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला सापाने दंश दिल्याचं ऐकलं नव्हतं. परंतु हे प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहिलं.

Reconstuctive Surgery करायला लागली

दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट जंगलात विषारी साप मोठ्या प्रमाणात आहेत. जराही निष्काळजीपणा केला तर तुमच्या जीवावर संकट ओढावू शकतं. याठिकाणी सापाने दंश दिल्याने अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. विशेष ज्या डच पर्यटकाला सापाने दंश दिला त्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी ३ तासाहून अधिक वेळ गेला तरीही तो जिवंत राहिला त्याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पीडित पर्यटकाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना Reconstructive Surgery करायला लागली. सध्या या पर्यटकाला डॉक्टरांच्या निगरानीखाली हॉस्पिटलमध्येच ठेवलं आहे.   

Web Title: Dutch man bitten by snake Cobra while sitting on the toilet during a safari tour in South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.