सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 12:34 PM2020-02-15T12:34:58+5:302020-02-15T12:41:27+5:30

आकाशगंगेतील सर्वात चमकदार ताऱ्यांपैकी एक बीटलग्यूज आता आपली चमक हरवत आहे. बीटलग्यूज हा लाल रंगाचा तारा आहे जो आरोयन आकाशगंगेचा भाग आहे.

A Dying Star One Thousand Times Bigger Than The Sun Could Soon Explode | सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा!

सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा!

Next

आकाशगंगेतील सर्वात चमकदार ताऱ्यांपैकी एक बीटलग्यूज आता आपली चमक हरवत आहे. बीटलग्यूज हा लाल रंगाचा तारा आहे जो आरोयन आकाशगंगेचा भाग आहे. हा तारा आता सुपरनोवा फेजकडे जात आहे. अशात यात विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुपरनोवा एक शक्तीशाली तारकीय विस्फोट आहे, ज्याने तारा नेहमीसाठी नष्ट होतो.

स्लेटच्या एका रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये बीटलग्यूजची चमक कमी झाल्याकारणाने याला सर्वात चमकदार ताऱ्यांच्या यादीतून १२व्या स्थानावरून २० व्या स्थानावर जागा देण्यात आली. पृथ्वीपासून ६४२. ५ प्रकाश वर्ष दूर असलेल्या या ताऱ्यात विस्फोट झाला तर हा मनुष्यांना दिसणारा पहिला सर्वात जवळचा सुपरनोवा होऊ शकतो.

CNET च्या एका रिपोर्टनुसार, एडवर्ड गिनान द्वारा एकत्र करण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार, विलेनोवा विश्वविद्यालयाच्या एका खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, बीटलग्यूज ४३० दिवसात आपली चमक नष्ट करू शकतो. ते म्हणाले की, आमची आकडेवारी जर योग्य असेल तर बीटलग्यूज २१ फेब्रुवारीला आपल्या सर्वात कमी चमक असलेल्या स्थितीत पोहचेल.

जास्तीत जास्त तज्ज्ञांचं असं मत आहे की, बीटलग्जूज आपल्या अंताच्या दिशेने जात आहे. बीटलग्यूज हा सूर्याच्या तुलनेत हजार पटीने मोठा आहे. जर हा तारा आपल्या आकाशगंगेत आला तर बृहस्पती ग्रहाच्या कक्षेपेक्षाही मोठा ठरेल. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त तज्ज्ञ याला सुपरजाएंट्स म्हणतात. याप्रकारचे तारे फार वेगाने वाढत आहेत आणि विस्फोटानंतर नष्ट होतात.


Web Title: A Dying Star One Thousand Times Bigger Than The Sun Could Soon Explode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.