5 वर्ष कानात अडकून राहिला इअरबड, जाणून घ्या कसा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:37 AM2022-11-18T10:37:39+5:302022-11-18T10:40:07+5:30
Earbud Stucked in Man Ear : इंग्लंडमधील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. अनेक दिवस ऐकण्यास समस्या होत असल्याने त्याने चेकअप केलं. तेव्हा रिपोर्ट पाहून तो हैराण झाला.
Earbud Stucked in Man Ear : जर तुम्ही इअरबडचा वापर करत असाल तर ही बातमी नक्की वाचली पाहिजे. हे वायरलेस डिवाइस अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं, पण याचे काही धोकेही आहेत. धोकेही असे की, तुमचा थोडासा बेजबाबदारपणा तुम्हाला खूप महागात पडू शकतो. इतकंच काय तर तुमची ऐकण्याची क्षमताही जाऊ शकते. इंग्लंडमधील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. अनेक दिवस ऐकण्यास समस्या होत असल्याने त्याने चेकअप केलं. तेव्हा रिपोर्ट पाहून तो हैराण झाला.
रॉयल नेव्हीमध्ये काम करणारे इंग्लंडचे विलिस ली पाच वर्षाआधी परिवाराला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जात होते. फ्लाइटमध्ये एअरप्लेनच्या आवाजापासून वाचवण्यासाठी त्यांनी कानात इअरबड लावलं. जेव्हा ते ऑस्ट्रेलियाला पोहोचले तेव्हा इअरबड कानातून काढण्यास विसरले. हळूहळू हे इअरबड त्यांच्या कानात आत घुसलं. यानंतर त्यांना ऐकण्यात समस्या येऊ लागली होती. सुरूवातीला त्यांना वाटलं की, एविएशन इंडस्ट्री बरीच वर्ष काम करत असल्याने त्यांना व्यवस्थित ऐकायला येत नसेल.
त्याशिवाय त्यांना वाटलं की, तरूण असताना ते रूग्बी खेळ खेळत होते. तेव्हा त्यांना जखम झाली असेल. त्यामुळे त्यांना ऐकण्यात समस्या येत असेल. पण ही समस्या हळूहळू वाढू लागली होती. तेव्हा त्यांनी एंडोस्कोप किट खरेदी केली आणि घरीच कान चेक करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांना दिसलं की, कानात पांढऱ्या रंगाची एक वस्तू अडकली आहे. त्यांनी लगेच डॉक्टरांना संपर्क केला. डॉक्टरांनी त्यांच्या कानातील इअर काढला तेव्हा त्यांना बरोबर ऐकू येऊ लागलं होतं. हा इअरबड 5 वर्ष त्यांच्या कानात अकडून होता.