दातात पॉपकॉर्न अडकले, प्रकरण थेट हार्ट सर्जरीपर्यंत पोहोचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:59 PM2020-01-08T12:59:39+5:302020-01-08T13:28:30+5:30

पॉपकॉर्न खाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे

eating popcorn lead british man to infection survived life after open heart surgery | दातात पॉपकॉर्न अडकले, प्रकरण थेट हार्ट सर्जरीपर्यंत पोहोचले!

दातात पॉपकॉर्न अडकले, प्रकरण थेट हार्ट सर्जरीपर्यंत पोहोचले!

Next
ठळक मुद्देपॉपकॉर्न खाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.पॉपकॉर्नमुळे दातांमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. एडम यांचा जीव वाचवण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागली आहे.

थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेल्यावर पॉपकॉर्न खाल्ले नाही तर अनेकांना चित्रपट पूर्ण पाहिल्यासारखा वाटत नाही. पॉपकॉर्न जगभरात लोकप्रिय आहे. मात्र पॉपकॉर्नमुळे सर्जरी झाल्याचं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. पॉपकॉर्न खाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. पॉपकॉर्न दातात अडकल्याने व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना थेट हार्ट सर्जरी करावी लागली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एडम मार्टिन असं 41 वर्षीय व्यक्तीचं नाव असून त्यांच्या दातामध्ये पॉपकॉर्न अडकला होता. पॉपकॉर्नमुळे दातांमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. अनेक उपकरणांचा वापर करून डॉक्टरांनी दातामध्ये अडकलेला पॉपकॉर्न बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर एडम यांचा जीव वाचवण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. 

एडम मार्टिन यांच्या मागच्या दातात सप्टेंबरमध्ये पॉपकॉर्न अडकला होता. दातात अडकलेला पॉपकॉर्न काढण्यासाठी एडम यांनी पेन, टूथपिक, तार आणि खिळ्याचा वापर केला. मात्र याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले. यामुळे दातामध्ये इन्फेक्शन झालं. पॉपकॉर्न काढण्याच्या नादात त्याच्या जबड्याचं नुकसान झालं. पुढे ते इन्फेक्शन हृदयापर्यंत पोहोचलं. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी एडम यांची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एडम यांना अस्वस्थ वाटू लागले होते. तसेच डोकेदुखीचा त्रास ही सुरू झाला होता. त्यामुळे एडम यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी एडम यांचा तपासणी केली असता इन्फेक्शनमुळे हे सर्व सुरू असल्याची माहिती मिळाली. एडम यांचा जीव वाचवण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. एडम यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसेच यापुढे कधीही पॉपकॉर्न खाणार नसल्याचं देखील म्हटलं आहे. 

'या' बातम्याही नक्की वाचा

बोंबला! गेल्या १५ वर्षात तिने ७ लाख रूपयांची पावडर खाल्ली, दिवसाला पावडरचा एक अख्खा डबा करते फस्त!

'या' देशातील लोकांना आता फक्त 6 तास करावे लागणार काम, आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी

 

रंगा आणि बिल्लाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच, पण हे दोघे इतके कुख्यात का होते?

आगा बाबो! 'या' जंगलात सापडलं जगातलं सर्वात मोठं उमललेलं फूल, इतकं की तुम्ही कल्पनाही केली नसेल....

 

Web Title: eating popcorn lead british man to infection survived life after open heart surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.