रिपोर्टर लाइव्ह न्यूज देत असताना चोराने मोबाईल पळवला, पण केली मोठी चुक; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:01 AM2021-10-22T10:01:29+5:302021-10-22T10:02:40+5:30
इजिप्शियन रिपोर्टर महमूद राघेब कैरो भूकंपानंतर रस्त्यावरुन लाइव्ह रिपोर्टींग करत होते. तेवढ्यात मोटारसायकलवरुन आलेल्या चोराने रिपोर्टरच्या हातून फोन हिसकाऊन घेतला.
कैरो:इजिप्तमधून एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. एका रिपोर्टरच्या हातातून फोन हिसकावून पळून गेलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तुम्हाला वाटेल की, यात काय विशेष. तर, चोराने जेव्हा फोन पळवला, तेव्हा रिपोर्टर लाइव्ह होता आणि तेवढ्यात चोराने त्याचा फोन पळवला. पण, यावेळी चोर फोन बंद करायचा विसरला आणि ही संपूर्ण चोरीची घटना लाइव्ह रेकॉर्ड झाली. यात त्या चोराचा चेहराही दिसला. या घटनेनंतर पोलिसांनी चोराची ओळख पटवून त्याला अटक केले.
द गार्डियन या ब्रिटीश न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इजिप्तच्या चौथ्या सर्वात मोठ्या शहर शुभ्र अल-खैमाहची आहे. इजिप्शियन रिपोर्टर महमूद राघेब कैरो भूकंपानंतर रस्त्यावरुन लाइव्ह रिपोर्टींग करत होते. तेवढ्यात मोटारसायकलवरुन आलेल्या चोराने रिपोर्टरच्या हातून फोन हिसकाऊन घेतला. पण चोराला माहित नव्हतं की, फोनचा कॅमेरा चालू आहे. त्यामुळे अनवधानाने त्या चोरट्याचा चेहरा फेसबुक लाइव्हवर दिसला.
#اليوم_السابع
— Yasmin Mahmoud (@M49828376Yasmin) October 19, 2021
مراسل اليوم السابع كان طالع لايف يتكلم عن الزلازل التليفون اتسرق منه والواد اللي سرقه كمل اللايف 😂 pic.twitter.com/ZAyHXN53z6
महमूद फेसबुकवर लाइव्ह रिपोर्ट करत होता, तेव्हा त्याला 20 हजारांहून अधिक लोक लाइव्ह पाहत होते. ही घटना व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच चोराला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आला गुन्हा कबुल केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 60 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.