बाबो! ३ हजार वर्ष जुन्या ममीतून येतो विचित्र आवाज, रेकॉर्डिंग ऐकल्यावर वैज्ञानिक झाले हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:35 PM2020-01-29T14:35:51+5:302020-01-29T14:44:57+5:30
3 हजार वर्ष जुन्या या ममीचा आवाज वैज्ञानिकांनी रेकॉर्ड केला. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
तुम्ही प्राचीन काळातील ममीबाबत रहस्यमय गोष्टी दाखवणारे अनेक सिनेमे पाहिले असतील. ज्यात अचानक हजारो वर्ष जुनी ममी अचानक जिवंत होतात. आता जरा विचार करा की, प्रत्यक्षातही असं होत असेल तर काय होईल. अर्थातच घाम फुटेल ना? ब्रिटनमध्ये एक अशीच घटना बघायला मिळाली आहे. इथे एका बॉक्समध्ये ठेवण्यात आलेल्या ममीमधून नेहमी विचित्र आवाज येत होते. त्यानंतर हे आवाज वैज्ञानिकांनी रेकॉर्ड करण्याचा विचार केला आणि हा रेकॉर्ड करण्यात आलेला आवाज ऐकून वैज्ञानिक हैराण झालेत.
ब्रिटनच्या लिड्स सिटी म्युझिअममध्ये एक ममी ठेवण्यात आली आहे. या ममीचं नाव नीसियामुन असं आहे. ३ हजार वर्ष जुनी हा ममी इजिप्तचा राजा फॅरो रामसेस-११ च्या एका पुजाऱ्याचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा पुजारी राजासाठी खास बातम्या घेऊन येत असे. तसेच राजाला धार्मिक गीतेही ऐकवत होता. इतकेच नाही तर त्याला ज्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलं त्यावर लिहिलं आहे की, हा इजिप्तचा खरा आवाज होता.
(Image Credit : Leeds Museums and Galleries)
वैज्ञानिक डेविड होवार्ड यांनी सांगितले की, जेव्हा ममीमधून हवा जात होती तेव्हा त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येत होते. त्यामुळे आम्ही हा आवाज रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्ही ममीच्या घशाचा सीटी स्कॅन केला आणि नंतर थ्री डी प्रिंटींगने त्याचा व्होकल कॉर्ड तयार केला. त्यानंतर ममीच्या गळ्यातून आवाज काढला.
(Image Credit : Social media/Leeds City Museum)(ममीचा तयार केलेला चेहरा)
होवार्डने सांगितले की, ममीच्या गळ्यातून आवाज आला. हा आवाज कढण्यासारखा होता. हा आवाज तसाच होता जसा ममीमधून हवा गेल्यावर येत होता. आवाज रेकॉर्ड करण्यात आला तेव्हा याचा व्हिडीओही शूट करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
(वैज्ञानिकांची टीम)
डेविड होवार्ड यांनी असेही सांगितले की, जेव्हा ममीचा सीटी स्कॅन करण्यात आला तेव्हा त्याच्या जिभेचा काही भाग गायब होता. पण कसा गायब झाला याबाबत काही माहिती मिळाली नाही. पण असं मानलं जात आहे की, हजारो वर्षापासून ठेवलेल्या या ममीची जीभ सडली असावी. हा ममी ३ हजार वर्ष जुना आहे.