ही महिला करते मृत देहांचा मेकअप, या विचित्र व्यवसायातून कमवते करोडो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:30 PM2021-09-17T15:30:25+5:302021-09-17T20:06:22+5:30
कधी मृतदेहांना मेकअप केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तेसुद्धा ब्रँडेड मेकअप (Dead Bodies makeup) . हो बरोबर वाचलंत. अशा मृतदेहांना एक मेकअप आर्टिस्ट मेकअप करते. तेही खास ब्रँडेड प्रोडक्ट वापरुन.
सेलिब्रिटी केवळ चित्रपटातच नव्हे तर इतरहीवेळी मेकअप केल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. लग्नात तर नवरीच्या मेकअपकडे सर्वांचे लक्ष असते. एखादा सण पार्टी असो असल्यास तुम्हीही मेकअप करत असालच. मेकअप करताना ब्रँडेड मेकअप वापरण्याकडे तुमचा जास्त कल असेल. पण कधी मृतदेहांना मेकअप केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तेसुद्धा ब्रँडेड मेकअप (Dead Bodies makeup) . हो बरोबर वाचलंत. अशा मृतदेहांना एक मेकअप आर्टिस्ट मेकअप करते. तेही खास ब्रँडेड प्रोडक्ट वापरुन.
फ्युनरल डायरेक्टर (Funeral Director) एलिन होलिस जिवंत नव्हे तर फक्त मृत माणसांचाच मेकअप करते. एलिन गेल्या अनेक वर्षांपासून मृतदेहाला मेकअप करण्याचा व्यवसाय (Business) करते. तिच्या या विचित्र व्यवसायाबद्दल तिचं वक्तव्य ऐकुन तर तुम्हाला धक्काच बसेल. ती म्हणते, 'एखादी व्यक्ती मृत झाली आहे, तिचा मेकअप करून काय फायदा,' असं जर कोणाला वाटत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. मृत्यूनंतरही व्यक्ती सुंदर दिसू शकतात. मृत्यूनंतरही आपल्या सौंदर्याविषयी लोकांनी चर्चा करावी, असं वाटणं हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. त्यामुळे मी मृतदेहांचादेखील मेकअप करते.''
एलिनने सोशल मीडियावर (Social Media) मृतदेहांचा मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या टिकटॉक अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्ससाठी एलिन नवे व्हिडिओ तयार करून शेअर करत असते. एका मृतदेहाचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ नुकताच तिने शेअर केला आहे. या व्हिडिओला तब्बल साडेसात लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत एलिनने मेकअपसाठी कोणतं साहित्य वापरलं जातं तेदेखील शेअर केलं आहे.
मृतदेहाचा मेकअप करण्यासाठी एलिनाकडे महागडी सौंदर्यप्रसाधनं (Cosmetics) असलेलं किट आहे. ती फाउंडेशनपासून लिपस्टिक आणि आय-लायनरपर्यंत सर्व प्रसाधनांचा वापर करते. हे किट पाहून अनेक लोकांनी एलिनाचं विशेष कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका मुलीनं लिहिलं, की 'अशी महागडी उत्पादनं माझ्याकडेदेखील नाहीत.'