वीज बिल येईल अर्ध्यावर; पंखे-कूलरची स्पीडही वाढेल! फक्त करावा लागेल हा खास जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:15 PM2022-03-21T18:15:49+5:302022-03-21T18:17:49+5:30
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपण एसी व्यवस्थित करून घेतो, पण कुलर, पंखे यांकडे आपण लक्ष देत नाही. तर आज आम्ही आपल्याला अशी एक खास ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या फॅन आणि कूलरची स्पीड तर वाढेलच, शिवाय आपले बिलही कमी होईल.
नवी दिल्ली - आता उन्हाळा जानवायला सुरुवात झाली आहे आणि यावर मात करण्यासाठी लोकांनी कूलर आणि एसी बाहेर काढले आहेत. जेथे कडाक्याच्या थंडीत पंखे सुरू नव्हते, तिथे आता तेही फूल स्पीडमध्ये सुरू झाले आहेत. मात्र, अनेक वेळा पुरेसे व्होल्टेज असूनही पंखे व्यवस्थित हवा देऊ शकत नाहीत. जर आपल्यालाही आपला पंखा कमी हवा देतो आहे आणि पॉवर युनिट्स अधिक खर्च होत आहे, असे वाटत असेल तर फॅनकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खरे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपण एसी व्यवस्थित करून घेतो, पण कुलर, पंखे यांकडे आपण लक्ष देत नाही. आज आम्ही आपल्याला अशी एक खास ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या फॅन आणि कूलरची स्पीड तर वाढेलच, शिवाय आपले बिलही कमी होईल. (Electricity Bill Reduce Trick)
हे काम सर्वाधिक परिणाम कारक -
बऱ्याच दिवसांनंतर पंखा सुरू केल्यास, पंखा व्यवस्थित हवा फेकत नाही, असे वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. असे झाल्यास आपल्याला इलेक्ट्रिशियनला कॉल करण्याची अथवा नवा पंखा आणण्याचीही गरज नाही. आपल्याला केवळ एक छोटीशी गोष्ट करायची आहे, ज्यामुळे आपल्या पंख्याचा वेग आपोआपच वाढेल. एवढेच नाही, तर फॅनची स्पीड वाढताच आपले वीज बिलही कमी होईल. कुठलाही पंखा कमी दाबात हवा देतो. तो हवा कापून खालच्या बाजूला फेकतो. यामुलेच पंख्याच्या ब्लेड पुढच्या बाजूला टोकदार आणि थोड्या प्रमाणावर वक्र असतात.
ब्लेडमध्ये धूळ जमते -
तज्ज्ञांच्या मते, पंख्याच्या ब्लेड हवेला कापतात यामुळे धूळ अथवा मातीचे ब्लेडच्या पुढच्या बाजूवर जमतात. यामुळे पंखा अधिक लोड घेतो. यामुळे त्याचा वेग कमी होतो आणि पंख्याची मोटारही अधिक लोड घेते. यामुळे वीज बिलही अधिक येते. मग तो सिलिंग फॅन असो, टेबल फॅन असो, कूलर असो अथवा AC असो. हा नियम सर्वांसाठीच लागू आहे.
ओल्या कपड्याने स्वच्छ करा पंख्याच्या ब्लेड -
पंख्याची स्पीड वाढविण्यासाठी आपल्याला केवळ पंख्याच्या ब्लेड ओल्या कपड्याने स्वच्छ करायच्या आहेत. मात्र यासाठी अधिक शक्ती लाऊ नका. कारण, असे केल्यास अलाइनमेंट खराब होऊ शकते. यानंतर आपण पंखा ऑन केला, तर त्याचा स्पीड आपल्याला वाढलेला दिसेल. याचबरोबर त्याचा आवाजही कमी होईल. यामुळे, पंख्याची मोटारही कमी लोड घेईल आणि वीज बिलावरही याचा परिणाम होईल.