JCBपाहून बिथरला हत्ती, अचानक केला हल्ला; पाहा थरारक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 04:22 PM2022-02-06T16:22:20+5:302022-02-06T16:22:58+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत असून, नेटीझन्स या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

elephant attack on JCB, video goes viral, Watch the thrilling video | JCBपाहून बिथरला हत्ती, अचानक केला हल्ला; पाहा थरारक व्हिडिओ

JCBपाहून बिथरला हत्ती, अचानक केला हल्ला; पाहा थरारक व्हिडिओ

googlenewsNext

जंगलात वाघ-सिंहासारखे एकापेक्षा एक हिंस्त्र प्राणी राहतात. पण, या प्राण्यांची हत्तीसमोर काहीच चालू शकत नाही. हत्ती हा जमिनीवरील सर्वात शक्तीशाली प्राणी आहे. तो त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखल जातो, पण जर एकदा हत्तीला राग आला, तर त्याला शांत करणे कठीण काम आहे. सोशल मीडियावर अशाच एका रागीट हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हत्तीच्या शक्तीचा अंदाज येईल.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक हत्ती अचानक जेसीबी मशीनसमोर येतो आणि जेसीबीला डोक्याने जोरदार टक्कर मारुन आपली शक्ती दाखवू लागतो. हत्ती आपल्या डोक्याने जोरात क्रेनला ढकलतो. काही सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे, पण या काही सेकंदातच हत्तीने आपली शक्ती दाखवून दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. wild_animals_creation नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले- 'हत्ती vs जेसीबी मशीन.' नेटीझन्स या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

Web Title: elephant attack on JCB, video goes viral, Watch the thrilling video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.