Elephant Kills Crocodile : हत्तीनं पाण्यात घुसून मारली मगर; झुंजीचा संपूर्ण VIDEO कॅमेऱ्यात कैद...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:00 PM2021-10-20T16:00:09+5:302021-10-20T16:04:44+5:30
हल्ला चढवल्यानंतर, हत्तीने मगरीला पाण्यातच आपटायला सुरुवात केली (Elephant Attack). या मादी हत्तीने मगरीवर आपल्या सोंडेने सपासप वार केले. दरम्यान, या मगरीने हात्तीच्या तावडीतून सुटण्याचाही बराच प्रयत्न केला. मात्र तीला हत्तीच्या तावडीतून सुटता आले नाही.
आफ्रिकन देश झाम्बिया (Zambia) येथून एक हत्ती (मादी) (Elephant) आणि मगरीच्या (Crocodile) झुंजीचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे. मादी हत्ती आपल्या पिल्लाला मगरीच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी तिच्याशी झुंज घेते. या दोन भयंकर प्रण्यांत झालेली ही झुंज एका टूरिस्टने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, आफ्रिकन हत्तींचा एक कळप झांम्बेझी नदीवर (Zambezi River) पाणी प्याण्यासाठी आला असता, ही घटना घडली. यावेळी एका मगरीने हत्तीच्या पिल्लावर हल्ला (Crocodile Attack) करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मादी हत्तीने त्या मगरीवर हल्ला चढवला आणि दोघांत जबरदस्त झुंज झाली.
हल्ला चढवल्यानंतर, हत्तीने मगरीला पाण्यातच आपटायला सुरुवात केली (Elephant Attack). या मादी हत्तीने मगरीवर आपल्या सोंडेने सपासप वार केले. दरम्यान, या मगरीने हात्तीच्या तावडीतून सुटण्याचाही बराच प्रयत्न केला. मात्र तीला हत्तीच्या तावडीतून सुटता आले नाही.
काही वेळानंतर हत्तीने त्या मगरीला जलाशयाच्या किनाऱ्यावर आणले. तेव्हा मगरीची हालचाल बंद झाली होती. यामुळे एक तर तिचा मृत्यू झाला असावा अथवा तिला गंभीर इजा झाली असावी असा तर्क लावला जात आहे. एकूणच या झुंजीत मादी हत्ती वरचढ ठरली.
ही संपूर्ण घटना एक टूरिस्ट (Tourist) हंस हेनरिक हारने (Hans Henrik Haahr) कॅमेऱ्यात कैद केली आहे. हेनरिक डेनमार्कचे रहिवारी आहेत. हत्ती आणि मगरीची ही झुंज कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.