हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा होता, तेवढ्यात भरधाव वेगाने बाईकस्वार आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 05:45 PM2021-11-17T17:45:27+5:302021-11-17T17:46:36+5:30
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
वेगाने वाहन चालवणे कोणासाठीही धोकादायक ठरू शकते. गजबजलेला रस्ता असो किंवा रिकामा, वेग तुमच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वेगाने येणारा बाईकस्वार पडल्याचे दिसतो. विशेष म्हणजे, यात त्याच्या गाडीचा वेग फार नव्हता, पण त्याच्या पडण्याचे कारण ठरला एक हत्ती. नेमकं काय घडलं, हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- 'हत्ती या घटनेबद्दल काय विचार करत असेल?' व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रिकाम्या रस्त्याच्या मधोमध एक हत्ती उभा आहे, तेवढ्यात एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने येतो.
What this elephant could be thinking !! Via WA. pic.twitter.com/olavzNkT9I
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 15, 2021
हत्तीला पाहताच तो आपल्या गाडीचा वेग कमी करण्याऐवजी वाढवतो आणि रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन जाऊ लागतो. रस्त्यावर उभ्या असलेल्या हत्तीच्या बाजूने आपली गाडी नेताना त्याच्या गाडीचे चाक रस्त्यावरून खाली उतरते आणि गाडी घसरते. तेवढ्यात वाईकस्वार तोल सांभाळतो आणि मोठा अपघात होण्यापासून बचावतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, व्हिडिओवर मजेदार कमेंट्सही येत आहेत.