Elon Musk Lookalike: स्वतःच्या डुप्लीकेटला पाहून चकीत झाले इलॉन मस्क, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:25 PM2022-05-11T14:25:34+5:302022-05-11T14:25:40+5:30
Elon Musk Lookalike: सध्या सोशल मीडियावर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
Elon Musk Lookalike: काही दिवसांपूर्वी टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका चीनी व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता इलॉन मस्क यांनी यी लॉन्ग मस्क (Yi Long Musk) याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यी लॉन्ग मस्क हुबेहूब इलॉन मस्क यांच्यासारखे दिसतात. तसेच, ते सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. एक ट्विटलला उत्तर देताना इलॉन मस्क म्हणाले की, "सध्याच्या काळात खोट्या गोष्टी सांगणे कठीण आहे. पण हा व्यक्ती खरा असेल, तर मला याला भेटायचे आहे."
Should we deploy Chinese @elonmusk as a decoy? pic.twitter.com/iIxnXtIEMw
— Anthony: BOT # 419,68 (@Muskstaycalm) May 9, 2022
डीपफेक काय आहे ?
इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला डीपफेक काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, डीपफेक एक अॅडव्हान्स टेक्नोलॉजी आहे, ज्यात कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावला जातो. अनेक देशांमध्ये डीपफेकचा सर्रास वापर होतो. या तंत्रज्ञानाचा वापर खोट्या बातम्या पसरवणे आणि इतर चुकीच्या गोष्टींसाठी केला जातो.
चीनी व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल
यू ली (Yu Li) ला गेल्या वर्षी पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली होती. त्यांचा एक फोटो इलॉन मस्क यांच्यासारखाच दिसतो. यू ली आपले व्हिडिओ डॉयिनवर शेअर करत असतात. डॉयिन टिकटॉकचे चीनी व्हर्जन आहे.