....म्हणून एलन मस्क अंतराळात पाठवणार गांजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 02:57 PM2019-12-20T14:57:59+5:302019-12-20T15:01:33+5:30

टेक्नॉलॉजीच्या विश्वात एलन मस्क एक मोठं नाव आहे. सतत वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ते चर्चेत असतात. त्यांची एक खाजगी स्पेज एजन्सी आहे.

Elon Musk will send international space station weed guy in march | ....म्हणून एलन मस्क अंतराळात पाठवणार गांजा!

....म्हणून एलन मस्क अंतराळात पाठवणार गांजा!

Next

टेक्नॉलॉजीच्या विश्वात एलन मस्क एक मोठं नाव आहे. सतत वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ते चर्चेत असतात. त्यांची एक खाजगी स्पेज एजन्सी आहे. आता ते एक मोठा प्रयोग करणार आहे. त्यांची कंपनी SpeceX ला नासाकडून कॉन्ट्रॅक्ट मिळतात. त्यानुसार एलन मस्कची ही कंपनी अंतराळात गांजा पाठवणार आहे.

मार्च २०२० मध्ये त्यांची कंपनी हा कारनामा करणार आहे. मार्च एक स्पेस कॅप्सूल पाठवलं जाणार आहे. याचं नाव असेल ड्रॅगन. याने स्पेसमध्ये गांजा पाठवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच गांजा फुंकतानाचा एलन मस्कचा एक व्हिडीओ समोर आला होता. यात ते लाइव्ह शोमध्ये गांजा ओढताना दिसत होते.

या स्पेस कॅप्सूलमध्ये केवळ गांजाच नाही तर इतरही काही गोष्टी पाठवल्या जाणार आहेत. जवळपास ४८० प्रकारच्या झाडांचे सेल्स पाठवले जाणार आहेत. कोलोराडो युनिव्हर्सिटीसोबत हा एका रिसर्च केला जाणार आहे. यात हे पाहिलं जाईल की, झाडांच्या सेल्सवर झीरो ग्रॅव्हिटीवर काय प्रभाव होईल. त्यासोबच कॉस्मिक रेंजवर याचं काय रिअ‍ॅक्शन असेल.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये झाडांचे सेल्स ठेवले जातील. ३० दिवसांपर्यंत हा रिसर्च केला जाणार आहे. सेल्स एका ठराविक तापमानावर ठेवले जातील. इथे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी त्या झाडांच्या सेल्समध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवतील. नंतर हे सेल्स पुन्हा पृथ्वीवर आणले जातील आणि पुन्हा टेस्ट केली जाईल. या प्रक्रियेतून डीएनएमध्ये अनेकप्रकारचे बदल होण्याची शक्यता समोर येत आहे.


Web Title: Elon Musk will send international space station weed guy in march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.