बॉसला विचारला एक साधा प्रश्न, बॉसने कामावरुनच काढुन टाकलं ना....तुम्ही नका करु ही चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:07 PM2022-04-10T19:07:13+5:302022-04-10T19:10:27+5:30

आपण काम करतो, ते फक्त पैसे कमावण्यासाठी. परंतु जेव्हा यासंबंधीत एक प्रश्न जेव्हा एका व्यक्तीने आपल्या बॉसला विचारला, तेव्हा मात्र त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं.

employee fired from job for asking about salary | बॉसला विचारला एक साधा प्रश्न, बॉसने कामावरुनच काढुन टाकलं ना....तुम्ही नका करु ही चूक

बॉसला विचारला एक साधा प्रश्न, बॉसने कामावरुनच काढुन टाकलं ना....तुम्ही नका करु ही चूक

Next

नवीन नोकरी मिळाल्याने सर्वांनाच आनंद होतो. परंतु आपण जेव्हा नवीन नोकरीला लागतो. तेव्हा मात्र आपल्या मनात नोकरीबाबत अनेक प्रश्न असतात. ज्याची उत्तर जाणून घेण्यासाठी काहीजण बिंधास्त आपल्या बॉसला प्रश्न विचारतात, तर काही लोक आपल्या मनातच ठेवतात. त्यात पगाराशी संबंधित प्रश्न हा तर महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण काम करतो, ते फक्त पैसे कमावण्यासाठी. परंतु जेव्हा यासंबंधीत एक प्रश्न जेव्हा एका व्यक्तीने आपल्या बॉसला विचारला, तेव्हा मात्र त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं.

अलीकडेच सोशल मीडिया साइट Reddit वर एका व्यक्तीने त्याचे नाव न सांगता खुलासा केला की, त्याची नोकरी एका विचित्र कारणांमुळे गेली आहे. या व्यक्तीने मुलांना शिकवण्यासाठी ट्यूटर उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीत अर्ज केला होता. त्या व्यक्तीची जॉबसाठी निवड झाली पण त्याने मेसेजवर त्याच्या भावी बॉसला त्याच्या मनातील एक प्रश्न विचारला, ज्यामुळे त्याच्या हातातून मिळालेली नोकरी गेली.

त्या व्यक्तीने मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने बॉसला फक्त  विचारले की, त्याला किती दिवसांचा पगार मिळेल? त्यामध्ये बॉसने त्याला सांगितले की, त्याला साप्ताहिक म्हणजे दोन आठवड्यांत पगार दिला जाईल. त्यानंतर पगार कोणत्या दिवशी मिळणार, असा प्रश्न त्याने त्याच्या बॉसला विचारला, तेव्हा मात्र त्याचा बॉस संतापला आणि त्याने आपला विचार बदलल्याचे सांगितले.

बॉस म्हणाला की, त्याला कामावर अशा व्यक्तीला ठेवायचे आहे, ज्याचं उद्देश काम करणे आहे. हे ऐकून कर्मचाऱ्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की, बॉसला नक्की काय म्हणायचे आहे, हे मला कळले नाही. 

त्यावर त्याने बॉसला सांगिलले की, त्याला तारीख माहित झाली तर, त्याला त्याचे संपूर्ण बिलं भरणं जास्त सोयीस्कर होईल. तेव्हा मात्र बॉस आणखी रागावला आणि त्याने पुन्हा रागाने उत्तर दिले की, तो अशा माणसाच्या शोधात आहे, ज्याला फक्त पगार मिळवायचा आहे. बॉसने सांगितले की, तुझं लक्ष फक्त पगारावर आहे. त्यांनी ना कामासंबंधी काही विचारले ना इतर कर्मचाऱ्यांबद्दल काही विचारले.

त्यामुळे बॉसच्या म्हणण्यानुसार, त्याला नोकरीसाठी अशी व्यक्ती हवी आहे जी नोकरीच्या वातावरणानुसार काम करेल, त्याच्या पगाराप्रमाणे नाही. त्यानंतर या व्यक्तीच्या लक्षात आले की, आपली नोकरी आत हातची गेली. तेव्हा त्याने आपल्या बॉसचं मन बदलण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु शेवटी बॉस काही ऐकायला तयार नव्हता. ज्यानंतर बॉसने त्याला कामावरुन अखेर काढून टाकले.

Web Title: employee fired from job for asking about salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.