अजब प्रेम की गजब कहानी! महिला जेलर अन् कैद्यामध्ये फुलले प्रेम, मेसेजेसची व्हायची देवाणघेवाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 01:29 PM2022-04-29T13:29:08+5:302022-04-29T13:33:39+5:30
महिला वॉर्डन अन् कैदी यांच्यात प्रेम संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. मुख्य म्हणजे त्या कैद्याकडे मोबाईल सापडला आहे.
प्रेम आणि प्रेमप्रकरणांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील पण कैदी आणि पोलिस यांच्या प्रेमाचा किस्सा ऐकला आहे का? इंग्लंडमध्ये ही घटना घडली आहे. ज्यामध्ये महिला वॉर्डन अन् कैदी यांच्यात प्रेम संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. मुख्य म्हणजे त्या कैद्याकडे मोबाईल सापडला आहे.
डेली मेल वेबसाईटच्या अनुसार इंग्लंडच्या नॉर्थैंप्टनशायर मधील एचएमपी ओन्ली या जेलमध्ये हे प्रेमप्रकरण सुरु होते. यात ४७ वर्षीय महिला वॉर्डन व्हिक्टोरिया लाईथवेट हिचे ३० वर्षाच्या जेम्स कॅलमर्स याच्याशी प्रेमसंबंध होते. हे दोघे एकमेकांना व्हॉट्सअॅपवर प्रेमाचे मेसेजेस पाठवायचे. पण त्यांच प्रेम अधिक फुलण्याआधीच जेल प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली अन् त्या कैद्याकडून २ फोन आणि ४ सिमकार्ड जप्त करण्यात आले.
यामुळे या महिला जेलरला ८ महिन्यांची व जेम्स याची २४ महिन्यांची अधिक शिक्षा मिळाली आहे. मुख्य म्हणजे या महिलेचा पतीही या जेलमध्ये पोलिस होता व त्यालाही अटक करण्यात आली आहे.