एका सर्जरीमुळे उद्ध्वस्त झालं आयुष्य, पत्नीही सोडून गेली आणि बिझनेसही बुडाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:58 PM2024-02-12T16:58:32+5:302024-02-12T16:58:50+5:30
एका व्यक्तीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्याकडे सगळं काही होतं, पण एका सर्जरीने त्याच्याकडून सगळं हिसकावून घेतलं.
काही लोक असे असतात जे आयुष्यात सगळं काही करतात, पण त्यांच्या नशीबापुढे त्यांचं काहीच चालत नाही. तुम्ही श्रीमंत असाल तरीही तुमच्यासोबत असं काही घडतं ज्यामुळे तुमच्या जीवनावर मोठं संकट येतं. सगळं होत्याचं नव्हतं होतं. यात आपलीच चूक असते. अशाच एका व्यक्तीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्याकडे सगळं काही होतं, पण एका सर्जरीने त्याच्याकडून सगळं हिसकावून घेतलं.
ही कहाणी आहे 55 वर्षीय एक व्यक्ती ज्याचं नाव आहे रोडनी विनचेस्टर. तो त्याच्या एका सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला, पण तेथील डॉक्टरांनी असं काही केलं की, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. मोठा बिल्डर असलेल्या रोडनीकडे ना त्याचा बिझनेस राहिला ना त्याचा परिवार.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, इंग्लंडमधील थेटफोर्डचा राहणारा रोडनी विनचेस्टरने एका सरकारी डॉक्टरकडून त्याची सर्जरी करून घेतली. त्याला गुडघ्यामध्ये समस्या होती आणि एका रूटीन सर्जरीच्या माध्यमातून त्याची ही समस्या दूर करायची होती. पण डॉक्टर जेरेमी पार्करने सर्जरीच्या नावावर त्याच्या गुडघ्याचा पूर्ण जॉईंटच काढला. या घटनेनंतर तो आधीसारखा चालूफिरू शकत नव्हता. नंतर त्याला समजलं की, त्याची समस्या सर्जरी न करताही दूर केली जाऊ शकत होती. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
बिझनेस बुडाला, पत्नीही गेली सोडून
गुडघ्याची समस्या झाल्यावर त्याचा बिझनेस ठप्प झाला. कारण त्याला तो सांभाळता येत नव्हता. पैसे नसल्या कारणाने त्याची पत्नीही त्याला अवस्थेत सोडून गेली. त्यामुळे तीन मुलांची जबाबदारीही रोडनीवर आली. दोन वर्ष त्याचा हा संघर्ष सुरू होता. त्यानंतर त्याला सरकारकडून फ्री फूड पॅकेज मिळाले आणि हॉस्पिटलकडून नुकसान भरपाई सुद्धा मिळाली. रोडनीचं आयुष्य आता आधीसारखं राहिलं नाही, पण इतकंही वाईट नाहीये.